Join us  

गोल गरगरीत ढेरी येण्याची ४ कारणं, पोट सुटूच द्यायचं नसेल तर फक्त ‘हे’ एवढंच करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 1:10 PM

4 Main Reasons For Increasing Belly Fat: वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यानंतर पोट सुटू द्यायचं नसेल तर या काही गोष्टी अगदी कटाक्षाने टाळलेल्याच बऱ्या...

ठळक मुद्देकाही गोष्टी केल्या आणि काही चूका टाळल्या तर तुम्हालाही ढेरी येणार नाही...

काही जणांची गोल गलगरीत वाढलेली ढेरी पाहिली की आपलंही असंच होणार नाही ना, अशी भीती वाटते. कारण त्यामुळे शरीर खूपच बेढब दिसू लागतं. पुरुषांच्या बाबतीत अशी ढेरी येते तर महिलांच्या बाबतीत पोटाचा वरचा भाग वाढू लागतो. वय वाढलं की ढेरी येणारच असं अनेक जण म्हणतात आणि त्याविषयाकडे दुर्लक्ष करतात. पण कित्येक वयस्कर माणसंही आपण अशी पाहातो ज्यांना अजिबातच ढेरी नसते. याचं कारण म्हणजे अगदी तरुण वयापासून ते काही गोष्टी अगदी नियमाने करत असतात (how to reduce belly fat). तुम्हीही तशाच काही गोष्टी केल्या आणि काही चूका टाळल्या तर तुम्हालाही ढेरी येणार नाही...(4 major mistakes that increases belly fat)

पोट सुटू द्यायचं नसेल तर...

 

१. खाण्याकडे लक्ष द्या

तुमचं पोट सुटू लागलं आहे याचा अर्थ तुम्ही असे पदार्थ खात आहात जे पचविण्यासाठी तुमच्या शरीराला खूप वेळ लागतो.

हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवायचं तर वाचा रामदेव बाबांचा सल्ला, हार्ट ॲटॅकचा धोकाही कमी होईल

शिवाय ते पदार्थ असे आहेत जे तुमच्या शरीराला पोषण देण्यापेक्षा कॅलरी वाढविण्यासाठीच जास्त मदत करतात. पोट सुटू द्यायचं नसेल तर असे पदार्थ अगदी कमीतकमी प्रमाणात खावेत.

 

२. व्यायाम

तुम्हाला कधीच कोणता व्यायाम करण्याची सवय नसेल तरी तुमची ढेरी सुटू शकते.

डोसे करण्यासाठी डाळ- तांदूळ भिजवताना लक्षात ठेवा ५ टिप्स, डोसा होईल परफेक्ट जाळीदार

त्यामुळे कमी वेळासाठी का असेना पण जास्तीतजास्त कॅलरी बर्न होऊ शकतील असा व्यायाम प्रकार निवडा. यामुळे वजन तर कमी होतेच, पण हृदयाचे आरोग्यही चांगले राहाते.

 

३. ताण घेऊ नका

छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेण्याची सवय ज्यांना असते त्यांचं पोट लवकर सुटतं. कारण जेव्हा तुम्ही ताण घेता तेव्हा तुमच्या शरीरातून कोर्टीसॉल हार्मोन स्त्रवला जातो.

कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत

या हार्मोनचं शरीरातील प्रमाण वाढलं तर ते बॅलेन्स करण्यासाठी लिव्हरला अधिकाधिक ग्लुकोज रिलिज करावे लागते. बऱ्याचदा तेवढ्या ग्लुकोजची शरीराला गरजही नसते. याचा परिणामही पोट सुटण्यावर होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा. 

 

४. अपूर्ण झोप

तुमची झोप पुर्ण होत नसेल आणि नेहमीच तुम्ही ६ तास किंवा त्यापेक्षाही कमी झोप घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर आणि पोट सुटण्यावर होऊ शकतो.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्सअन्न