वजन कमी करणं सोपं काम नाही. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. रेग्युलर मॉर्निंग रुटीमध्ये तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टींचा समावेश करू शकता. सकाळच्या ४ सवयी तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यास आणि फॅट लॉस करण्यात मदत करू शकता. (Morning Habits to Help You Lose Weight) हे उपाय करण्यासाठी तुम्हाला जीम किंवा योगा क्लासेसला जाण्याची काही गरज नाही. (4 Morning Habits to lose weight fast)
रोज सकाळी एक ग्लास पाणी प्या
सकाळची सुरूवात रोज एक ग्लास पाणी पिऊन करा. ब्रश केल्यानंतर १ किंवा २ ग्लास पाणी प्या. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. याशिवाय जास्त पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म रेट वाढेल. यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होईल. पाणी प्यायल्याने पूर्णवेळ पोट भरल्यासारखं वाटेल आणि आजारांचा धोका टाळता येईल.
सुर्यप्रकाशात जा
सकाळी काहीवेळासाठी उन्हात जाणं तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. सुर्याच्या प्रकाशाने व्हिटामीन डी मिळते. व्हिटमान डी मुळे शरीरातील हार्मोनल बदल नियंत्रणात राहतात. पूर्ण दिवस फ्रेश वाटतं.
अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर
नाश्ता स्किप करू नका
दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी सकाळी नाश्ता करणं फार महत्वाचं असते. नाश्त्यामध्ये हाय प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही आणि वजन कमी होण्यास मदत होईल. अंडी, पनीर, ग्रीक योगर्ट, चिया सिड्स, नट्स यांसारख्या प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग
व्यायाम करा
व्यायाम वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रोज सकाळी काहीवेळ व्यायाम करा. यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय मेटाबॉलिज्म चांगला राहील. वजन कमी होण्यासही मदत होईल तुम्ही काही स्ट्रेचिंग व्यायामही करू शकता.
याशिवाय तुम्ही रोज मेडिटेशन करू शकता. आपले डोळे बंद करून काही मिनिटांसाठी श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. मेडिटेशन तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उत्तम ठरतं. नियमित योगा करा. मसल्स स्ट्रेच केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. याशिवाय तुमचं शरीर योग्य आकारात येईल.