Lokmat Sakhi >Fitness > बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल...

बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल...

Fitness tips: पोटाचा घेर निश्चितच होईल कमी. त्यासाठी करून बघा हे ५ व्यायाम. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 01:50 PM2022-02-02T13:50:28+5:302022-02-02T13:52:08+5:30

Fitness tips: पोटाचा घेर निश्चितच होईल कमी. त्यासाठी करून बघा हे ५ व्यायाम. 

4 powerful exercises for reducing belly fat | बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल...

बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल...

Highlightsहा सगळा त्रास होऊ नये आणि आपणही इतर मैत्रिणींसारखं स्लिम ट्रिम व्हावं, म्हणून हे काही व्यायाम करा..

सुटलेलं पोट कसं आणि किती लपवावं हा ज्यांचं पोट सुटलेलं असतं अशा सगळ्याच मंडळींना छळणारा प्रश्न. फोटो काढायचा म्हटलं की या सुटलेल्या पोटाचा जाम वैताग येतो. ज्या मैत्रिणींच्या पोटाचा घेर वाढलेला असतो, त्यांना तर कपड्यांचं सिलेक्शन करतानाही भारीच चोखंदळ रहावं लागतं.. मनासारखे कपडे घालता येत नाहीत.. हा सगळा त्रास होऊ नये आणि आपणही इतर मैत्रिणींसारखं स्लिम ट्रिम व्हावं, म्हणून हे काही व्यायाम करा.. यापैकी जो व्यायाम प्रकार तुम्हाला आवडेल तो करा.. पण नियमितपणा ठेवा. 

 

१. योगासने (Yoga)
योगासनांचे खूप प्रकार आहेत. पण त्यापैकी पोट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी योगासने निवडून तुम्ही त्यांचा नियमित सराव करू शकता. पाठीवर झाेपून करण्याची जी योगासने आहेत, त्यामुळे पोटाचा घेर कमी होतो. चक्रासन, नौकासन यासाठी विशेष उपयुक्त ठरतात. पाठीवर झोपून दोन्ही पाय ९० डिग्री कोनात उचलणे, त्यानंतर ४५ डिग्रीमध्ये ठेवणे. दोन्ही पाय एकसोबतच क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज फिरवणे या व्यायाम प्रकारांनी पाेटावरची चरबी झपाट्याने कमी होते.

 

२. पुशअप्स.. (push-ups)
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी हा एक खूप चांगला व्यायाम प्रमार आहे. दररोज सकाळी नियमितपणे पुशअप्स केल्यास पोटाचा घेर तर कमी होईलच पण आरोग्यालाही इतर अनेक फायदे होतील.

 

३. प्लँक (planks)
या प्रकारचं वर्कआऊट केल्यामुळे पोटावर जबरदस्त ताण येतो आणि त्यामुळे त्या भागातली अतिरिक्त चरबी वितळायला मदत होते. प्लँक करण्यासाठी सगळ्यात आधी गुडघ्यावर बसा. यानंतर हाताचे कोपरे ते बोटं हा भाग जमिनीवर टेकवा. पाय मागे सरळ न्या आणि पायाच्या बोटांवर तोल सांभाळायचा प्रयत्न करा.. ही स्थिती १५ ते २० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू वेळ आणखी वाढवा..

 

४. क्रंचेस (crunches)
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उत्तम मानला जातो. अनेक जण क्रंचेस करूनच पोटावरची चरबी कमी करतात. क्रंचेस करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा आणि शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही हा डोक्याच्या खाली ठेवा. आता तळपाय जमिनीवरून न उचलता  डोकं, मान आणि पाठीचा थोडा भाग उचलण्याचा प्रयत्न करा. 


 

Web Title: 4 powerful exercises for reducing belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.