वजन वाढणे हे जरी सोपे असले तरी, वजन कमी करणे हे काही खायचं काम नाही. बिघडलेली जीवनशैली, योग्य आहाराचे सेवन न करणे, अपुरी झोप, या कारणांमुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो. व्यायाम व आहारावर अधिक भर टाकतो. ज्यामुळे वेट लॉस होते. पण काही लोकांचे वेट लॉस झाल्यानंतरही वजन झपाट्याने वाढते. असे का होते? याचा कधी आपण विचार केला आहे का?
वेट लॉस नंतर वेट गेन होण्यामागे अनेक करणे असू शकतात. नकळत आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे वेट गेन होते. यासंदर्भात, डायटीशियन सिमरन कौर यांनी वेट गेन होण्यामागे कोणत्या चुका कारणीभूत ठरतात. याबाबतीत माहिती दिली आहे(4 Reasons Why You're Gaining Weight Back After Losing It).
रुटीनवर लक्ष ठेवा
बहुतांश लोकं वजन कमी झाल्यानंतर आपले पूर्वीचे रुटीन फॉलो करतात. डायटीशियन आपल्याला नेहमी रुटीन फॉलो करण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये खाणे-पिणे, झोपणे-जागणे आणि इतर अनेक प्रकारच्या योग्य गोष्टींचा समावेश असतो. ज्यामुळे वेट लॉस होते. पण बहुतांश लोकं वेट लॉस झाल्यानंतर आपल्या रुटीनकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे पुन्हा वेट गेन होते.
वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स
व्यायामाकडे लक्ष न देणे
वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम दोन्ही महत्त्वाचे आहे. अनेकदा लोकांना वाटतं की वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, पण तसं नाही. वेट लॉस करण्यासाठी व्यायाम आणि आहार दोन्ही महत्वाचे आहे. वजन कमी झाल्यानंतर व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. वेट प्रॉपर मेन्टेन ठेवण्यासाठी व्यायाम करायला हवेच.
निरोगी आहाराकडे दुर्लक्ष करणे
वजन कमी करताना निरोगी आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. अनेक जण वजन कमी झाल्यानंतर जंक फूडचे सेवन करतात. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. वजन कमी झाल्यानंतर निरोगी आहाराकडे दुर्लक्ष करू नका. डाएटला फॉलो करा.
जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय
पुरेशी झोप हवीच
हेल्दी वेट मेन्टेन ठेवण्यासाठी शरीराला आराम देखील हवा. झोपेच्या चक्राचा थेट परिणाम आपल्या वजनावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते. स्ट्रेस लेव्हलचा देखील आपल्या वजनावर परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी करताना ८ तासांची झोप आवश्यक आहे.