घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये स्त्रिया इतक्या व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फारसा वेळच मिळत नाही. स्त्रिया या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असतात. परंतु प्रत्येकाची काळजी घेता घेता त्या स्वतःच्या आरोग्याकडे बहुदा दुर्लक्ष करतात. यामुळे पोटाची चरबी वाढण्यापासून ते वजन वाढेपर्यंतच्या असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. एवढेच नव्हे तर बऱ्याचजणींना वेगवेगळ्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या वजनामुळे आपले आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींना हानी पोहोचते.
स्त्रियांनी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. स्त्रियांना जरी रोजच्या धावपळीच्या रुटीनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेळ मिळत नसेल, तरीही त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून एक्सरसाइज केला पाहिजे. या रोजच्या गडबडीत आपल्याला जर जिम किंवा योगा करणे किंवा फिटनेससाठी बाहेर जाणे शक्य होत नसेल तर आपण घरच्या घरी व्यायाम करु शकता. सकाळी उठल्या उठल्या उशीचा वापर करून आपण साधे - सोपे एक्सरसाइज करु शकतो. फिटनेस एक्सपर्ट प्रियांकाने उशीचा वापर करून कोणत्या प्रकारचे व्यायाम करता येतील याची माहिती शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रियांका म्हणते, " उशीचा विचार केल्याने आपल्याला फक्त झोपच आठवते" परंतु, उशी हे इतके शक्तिशाली साधन आहे की आपण आपल्या फिटनेसची काळजी घेऊ शकता. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये जाऊन घाम गाळणे आवश्यक नाही. यासाठी घरात असलेल्या वस्तूंचा वापर देखील केला जाऊ शकतो(4 Simple Exercises That You Can Do In 10 Minutes To Lose Belly Fat By Using Pillow).
सकाळी उठल्या उठल्या उशीचा वापर करून करता येतील असे व्यायाम प्रकार :-
१. विंडशील्ड वाइपर (Windshield Wiper) :- हा व्यायाम प्रकार केल्याने पोटाबरोबरच मांड्या आणि पायाची चरबीही कमी होते. हा व्यायाम करताना पाय गाडीच्या वायपरप्रमाणे हलवावे लागतात, म्हणून त्याला विंडशील्ड वायपर (Windshield Wiper) असे म्हणतात. सर्वप्रथम आपल्या पाठीवर सरळ झोपा. त्यानंतर आपले दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही बाजूंना पसरवून घ्यावेत. आता दोन्ही पायांच्या पंज्यात उशी घट्ट पकडून ठेवा. आता आपले दोन्ही पाय एका सरळ रेषेत वर आणावेत. आपले पाय कंबरेपासून ९० अंशांचा कोन करून सरळ ठेवा. आता पाय दोन्ही दिशांना हलवत प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळवावेत.
रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...
२. पिलो क्रंच (Pillow Crunch) :- पिलो क्रंच हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. जो पोटावरील चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरतो. यामुळे पाठीचे स्नायू देखील मजबूत होण्यास मदत मिळते. पाठीवर सरळ झोपा. आपले दोन्ही पाय सरळ रेषेत खाली सोडून पाठीवर ताठ झोपा. आत उशी हातात दोन्ही हातात धरा. उशी दोन्ही हातात धरून डोक्यावर सरळ रेषेत हात वर करुन घ्यावेत. श्वास सोडताना मान सरळ ठेवा. आता शरीराचा वरचा भाग खांद्यातून हलकेच वर उचला त्याचवेळी आपले दोन्ही हात पुढे पायांच्या दिशेने येऊ द्यात, आपले पाय देखील गुढघ्यातून दुमडून वर उचलावेत. नंतर या हातातल्या उशीने पायाच्या गुडघ्यांना स्पर्श करावा. असे किमान १५ ते २० वेळा करावे.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...
दिवसभरात कधी वजन केले तर वजन अचूक कळते? वजन काट्याची खास ट्रिक...
३. अल्टर्नेटीव्ह लेग रेजेस विथ क्रंच (Alternate Legs Raised With Crunch) :- या व्यायामामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते . याच्या मदतीने शरीराची मुद्रा ठीक करता येते. याशिवाय हा व्यायाम रोज केल्याने नितंब आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. सर्वप्रथम पाठीवर सरळ रेषेत ताठ झोपून घ्यावे. त्यानंतर उशी दोन्ही हातात धरा. आता आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ रेषेत वर जाऊ द्या. आता शरीराचा वरचा भाग खांद्यातून अलगद वर उचलून घ्या यासोबतच उजवा पाय देखील वर उचला. नंतर डोक्यावरचे हात खाली आणून उशीने पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अशाच स्थितीत व्यायाम करत रहा, अनुक्रमे एकदा उजवा पाय व एकदा डावा पाय वर उचलून हा व्यायाम करावा.
४. रशियन ट्विस्ट (Russian Twist) :- हा व्यायाम पोटाच्या आजूबाजूच्या स्नायूंवर काम करतो आणि कंबरेची चरबी कमी करतो. शिवाय, हा व्यायाम तुमच्या खांद्यांना आणि नितंबांना टोन करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. सर्वप्रथम खाली जमिनीवर असून पाय सरळ रेषेत समोर सोडून घ्यावेत. आता नितंबांच्या मदतीने शरीराचा समतोल जमिनीवर ठेवा. हे करत असताना, पाठ ४५ अंशांवर झुकलेली असावी. गुडघे वाकवून पाय जमिनीपासून हलकेच वर उचला व पायांच्या दोन्ही टाचांवर जोर देऊन शरीराचा तोल सांभाळा. आत दोन्ही हातात उशी धरा. पाठ थोडी झुकवून कमरेचे स्नायू घट्ट करा. त्यानंतर हातातील उशी प्रथम डावीकडे आणि नंतर उजवीकडे फिरवा. डावीकडे किंवा उजवीकडे टर्न होत असताना नितंब स्थिर एका जागेवर ठेवून कमरेतून झुका. असे किमान १५ ते २० वेळा करा.