वेट लॉस (Weight Loss) करणं हे आजकाल लोकांसाठी टास्क बनत चाललं आहे. वजन वाढण्याच्या अनेक करणे आहेत. पण कमी करताना नाकीनऊ येतात. आवडते पदार्थ खाणं स्किप करणे, डाएट, व्यायाम यासगळ्या गोष्टी करून वजन कमी होते. पण या गोष्टी पुढे देखील फॉलो करावे लागतात. बऱ्याचदा नकळत घडणाऱ्या चुकांमुळे कमी झालेलं वजन पुन्हा वाढते. तर काही वेळेला डाएट आणि व्यायाम करूनही वेट लॉस होत नाही.
काही लोकं नाश्ता किंवा रात्रीचं जेवण स्किप करतात (Night Habits). पण जेवण सोडल्याने वजन कमी होत नाही. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, रात्रीच्या या काही सवयी अंगीकारा (Lose Weight). पण नक्की कोणत्या सवयी? याबद्दलची माहिती वेट लॉस कोच आणि फिटनेस एक्सपर्ट पायल अस्थाना यांनी दिली आहे(4 Sleep Habits That Can Help You Lose Weight).
झोप महत्वाची
वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे झोपताना नेहमी आरामदायक वातावरण तयार करा. मऊ गादी आणि उशांचा वापर करा. खोली मंद प्रकाशात ठेवा. यासह सुगंधित मेणबत्त्या लावा. या वातावरणात आपल्याला नक्कीच चांगली झोप लागेल.
वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन
झोपणे आणि उठण्याची वेळ ठरवा
जर आपल्याला उत्तम झोप हवी असेल तर, झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ निश्चित करा. आपला फिटनेस मुख्यत्वे आपल्या झोपेशी संबंधित आहे. दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शरीराचे बायोलॉजिकल क्लॉक योग्यरित्या कार्य करेल. शिवाय व्यायाम करण्यास उर्जा मिळेल.
स्क्रीन टायमिंग कमी करा
रात्री झोपण्यापूर्वी स्मार्टफोन, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीसारखी उपकरणांचा वापर टाळा. या गॅजेट्समधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे निद्रानाश होते. मुख्य म्हणजे मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करते. ज्यामुळे झोपेदरम्यान अडचण निर्माण येते. झोप कमी झाल्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे वजन वाढते.
वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम
कॅफिनयुक्त पदार्थ टाळा
बऱ्याच जणांना कधीही कॉफी आणि चहा पिण्याची सवय असते. जर आपल्यालाही सवय असेल तर, बदला. कारण कॅफिनच्या सेवनाने झोपेवर परिणाम होतो. झोप अपुरी झाल्यावर दिवसभर थकवा जाणवेल. ज्यामुळे वर्कआउट रुटीन अपूर्ण राहील. शिवाय दिवसभर थकवा जाणवेल. आपण झोपण्यापूर्वी कोमट दूध, ग्रीन टी किंवा हर्बल टी पिऊ शकता.