Join us  

जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2023 3:44 PM

4 Spices That Reduce Belly Fat - Natural Weight Loss काही केल्या पोट कमी होत नसेल तर हा उपाय नियमित करुन पाहा

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. वाढलेल्या वजनामुळे लोकं हैराण आहेत. स्ट्रिक्ट डाएटसह हेवी वर्कआउट करून लोकं वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतात. पण काही जणांचे काही केल्या वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण एक घरगुती उपाय करू शकता. व्यायामसह आहारात या ४ मसाल्यांचा वापर करून पाहा. या उपयामुळे नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल.

यासंदर्भात पोषण तज्ज्ञ निखिल वत्स सांगतात, ''काही मसाले खाल्ल्याने पोट कमी होऊ शकते. पदार्थातील चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा मसाल्यांचा वापर करतो. मसाल्यांमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. काही मसाल्यांच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते''(4 Spices That Reduce Belly Fat - Natural Weight Loss).

हे ४ मसाले खाल्ल्याने वजन होईल कमी

जिरे

कोणतीही फोडणी असो, आपण त्यात जिरं घालतोच. जिरं घातल्याने पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. जिरं खाल्ल्याने इन्शुलिनच्या संवेदनशीलतेत बदल होऊ लागतो. त्यात असलेल्या फायटोस्टेरॉलच्या मदतीने खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर, नियमित जिऱ्याचे पाणी प्या. जिरे पावडर मिसळून दही किंवा ताक पिणे देखील फायदेशीर ठरते.

जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

हळद

हळदीशिवाय रेसिपीमध्ये टेस्ट किंवा रंग येत नाही. हळद खाल्ल्याने शरीरातील जळजळ कमी होते. व त्याचबरोबर अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात. हळदीच्या मदतीने चयापचय नियंत्रित राहते. जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी हळदीचे दूध प्यायल्यास खूप फायदा होतो.

काळी मिरी

काळी मिरी खाल्ल्याने चरबीच्या पेशी बनण्याची प्रक्रिया थांबते, ज्यामुळे पोट आणि कंबरेवर चरबी जमा होत नाही. यासाठी आपण काळ्या मिरीचा चहा पिऊ शकता, तसेच त्याची पावडर सॅलडमध्ये किंवा उकडलेल्या भाज्यांमध्ये घालून खाऊ शकता.

सकाळी उपाशीपोटी चुकूनही खाऊ नयेत असे ४ पदार्थ, वजन कमी होण्याऐवजी वाढेल झपाट्याने

दालचिनी

दालचिनी पोटाची आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. दालचिनी शुगरचे फॅटमध्ये रूपांतर होण्यापासून रोखते. त्यामुळे पोटाची चरबी विरघळते, व जमा होत नाही. यासाठी लो फॅट दुधात आपण दालचिनी पावडर मिक्स करून पिऊ शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स