Join us  

उन्हाळ्यात व्यायामाला सुरुवात करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी.. तज्ज्ञ सांगतात, उकाड्यातही राहाल फिट अँड फाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2023 4:44 PM

4 Step Formula Summer Fitness Tips : उन्हाळ्यात व्यायामप्रकार निवडताना लक्षात ठेवायला हव्यात असा गोष्टी...

मनाली मगर-कदम 

व्यायाम म्हणजे हिवाळा असे आपल्या डोक्यात पक्के गणित असते. पण उन्हाळ्याचा दिवस मोठा असल्याने या काळात आपल्याला थोडा जास्त वेळ मिळू शकतो. मात्र उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना आपण आणखी शरीराला कष्ट देऊन आणि घामाघूम होऊन व्यायाम करण्याचा विचारही करु शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कुठलाही व्यायाम करण्यासाठी घराबाहेर जाणे होत नाही. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होतं, हवेतीस ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे व्यायाम करणे खूप अवघड होऊन जाते. अशावेळी शरीर लवकर थकते, मन प्रसन्न राहत नाही. मध्येच पाऊस, मध्येच वारा, कडक ऊन यांमुळे निसर्गाच चक्रही बिघडले आहे. अशा काळात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

(Image : Google)

उन्हाळ्यात आपले वजन कमी होते पण यामध्ये चरबी कमी होत नाही तर घामावाटे पाणी, क्षार हे बाहेर पडतात. तसेच या काळात भूक मंदावते,पचनशक्ती कमी होते. त्यामुळे मांसपेशींना पोषक द्रव्य मिळत नाहीत आणि त्या कमी होऊ लागतात. शरीराचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी क्षार व पाणी यांचा समतोल राखणे गरजेचे असते. यासाठी ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे तसेच व्यायाम प्रकारांमध्येही बदल करणे तितकेच गरजेचे आहे. व्यायाम करताना नवीन शिकण्याचा उत्साह, आनंद व शरीरात होणाऱ्या सकारात्मक बदलामुळे येणारा सकारात्मक भाव महत्त्वाचा असतो. थंडीच्या काळात आपण वेट ट्रेनिंगचे अनेक पर्याय निवडू शकतो, पण उन्हाळ्यात व्यायामप्रकार कसा निवडावा याविषयी लक्षात घेऊया. 

FITT(फिट) फॉर्मुला

१. Frequency (फ्रिक्वेन्सी)

आठवड्यातील किती दिवस व्यायाम करावा याबाबत योग्य ते नियोजन करायला हवे.

२. Intensity (तीव्रता)

आपण करत असलेल्या व्यायामाची तीव्रता किती असावी हे लक्षात घ्यायला हवी. कारण आपल्याला झेपेल इतक्याच तीव्रतेचा व्यायाम करायला हवा.  

(Image : Google)
 

३. Time (वेळ) 

व्यायाम दिवसातल्या कोणत्या वेळेला आणि किती वेळ करावा याचेही योग्य ते नियोजन करायला हवे. 

४. Type (प्रकार) 

आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम झेपेल ते पाहून व्यायामाचा प्रकार लक्षात घ्यायला हवा. 

(लेखिका योग शिक्षिका आहेत)

manali227@gmail.com

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्ससमर स्पेशल