आपली रात्रीची झोप व्यवस्थित पूर्ण झाल्यावर सकाळी उठलो की आपल्याला फ्रेश वाटते. सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात पहिले जी कामे करतो त्यावरच आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते. जसे की आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम योगा, मेडिटेशन, व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक अशा काही ऍक्टिव्हिटीज केल्या की आपला संपूर्ण दिवस अगदी आनंदात आणि मजेत जातो, तसेच यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश देखील वाटते. जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपले मन, शरीर आणि आत्मा आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतरचे आपले रूटिनही तसेच ठेवायला पाहिजे. जर सकाळी उठल्यावर तुम्हांला फ्रेश आणि उत्साही वाटत असेल तर दिवसभर तुमचे मानसिक स्वास्थ आणि शरीर प्रसन्न राहते.
सकाळी उठल्यावर आपला संपूर्ण दिवस प्रसन्न जावा यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून रोज त्याचे अनुसरण केले तर संपूर्ण दिवसचं नाही तर कायमच फ्रेश वाटते. बदलत्या जीवनशैलीनुसार, आपण सकाळी उठल्यावर कामाच्या गडबडीत काही गोष्टी करायच्या मुद्दाम टाळतो, किंवा वेळे अभावी आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. यासाठीच दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी सकाळी उठल्या उठल्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून त्या केल्यास संपूर्ण दिवस फ्रेश जातो(4 Things To Do Before 7 Am In The Morning For Happy & Healthy Life How To Improve Life Quality).
सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी ?
१. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून रहा दूर :- आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या सर्वातआधी मोबाईल फोन हातात घेऊन तासंतास बघत बसण्याची सवय असते. सकाळी उठल्यानंतर आपल्याला मोबाईलफोन, आयपॅड, लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते. एका रात्रीत आपण काय महत्वाचे मिस केले की काय हे पाहण्याची आपल्याला उत्सुकता असते. मात्र ही सवय आपल्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे जमेल तेवढं सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे. सुरुवातीला ही सवय सोडवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कमीत कमी १५ मिनिटे मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठल्यावर मोबाईल चेक करणे, सोशल मीडियावर वेळ घालवत तसेच बसून राहणे, ही सवय चुकीची आहे. हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. यासाठीच आपण झोपी जाण्यापूर्वी मोबाइल डेटा बंद करा किंवा आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवा.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
२. सकाळी उठल्यावर सकारात्मक गोष्टींचा विचार करा :- सकाळी उठल्यावर आनंदी राहण्यासाठी किंवा प्रसन्न वाटण्यासाठी नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे. या दिवसांमध्ये जीवनशैलीमध्ये तणाव असणे खूप सामान्य गोष्ट झाली आहे. या तणावामुळे लोकांना सतत आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवत असतात. ताणतणावामुळे हृदयरोग, मधुमेह, नैराश्य, दमा यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका देखील वाढत आहे. म्हणून शक्य असेल तितका ताणतणाव घेणे टाळावे, यासाठीच सकाळी उठल्यावर आपल्याला दिवसभरात काय काय करायचे आहे याचा विचार करून साकारात्मक गोष्टींचा विचार करावा.
३. योगा, व्यायाम यांसारख्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात :- सकाळी उठल्यावर दिवस फ्रेश जावा यासाठी दिवसाची सुरुवात देखील तितकीच चांगली झाली पाहिजे. दिवसाची सुरुवात चांगली होण्यासाठी योगा, व्यायाम यांसारख्या ऍक्टिव्हिटीज करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. सकाळी उठल्यावर योगा, मेडिटेशन, व्यायाम यांसारख्या ऍक्टिव्हिटीज केल्याने दिवभर तुम्हांला फ्रेश वाटून आपला संपूर्ण दिवस फ्रेश आणि आनंदी जाईल.
व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....
४. सकाळचा नाश्ता :- आपल्यापैकी बरेचजण सकाळचा नाश्ता करणे टाळतात. काहीवेळा कामाच्या घाई गडबडीत आपण नाश्ता करायचे विसरतो किंवा करत नाही. खरतर रात्रभराच्या ७ ते ८ तासांच्या उपवासानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला भूक लागते अशावेळी खाणे खूपच गरजेचे असते. आपण सकाळी जो नाश्ता करतो त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवसभरात काम करण्यासाठीची ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा कधीच चुकूनही स्किप करू नये.
ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...