Lokmat Sakhi >Fitness > मुलांनी रोज करायला हवी ४ योगासनं, सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता 

मुलांनी रोज करायला हवी ४ योगासनं, सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता 

Important Yogasana For Children: मुलांना जशी उत्तम आहाराची गरज आहे, तशीच व्यायामाचीही.. शरीर आणि मन दोन्हींच्या प्रगतीसाठी मुलांना ही काही योगासने नियमित करायला लावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 09:27 PM2022-08-16T21:27:40+5:302022-08-16T21:28:25+5:30

Important Yogasana For Children: मुलांना जशी उत्तम आहाराची गरज आहे, तशीच व्यायामाचीही.. शरीर आणि मन दोन्हींच्या प्रगतीसाठी मुलांना ही काही योगासने नियमित करायला लावा...

4 types of yoga for children, that helps to increase their concentration, height and makes them physically strong | मुलांनी रोज करायला हवी ४ योगासनं, सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता 

मुलांनी रोज करायला हवी ४ योगासनं, सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता 

Highlightsमुलांकडून जर ही काही योगासनं नियमितपणे करून घेतली तर तब्येतीसोबतच त्यांच्या बुद्धीचाही विकास होईल.

योगासने म्हणजे मोठ्या किंवा वयस्कर मंडळींनी करायचं काम, असा एक गैरसमज अनेकांच्या मनात असतो. पण योगासनं हे काही केवळ वयस्कर किंवा प्रौढ व्यक्तींनीच करायचा व्यायाम नाही. काही योगासनं अशीही आहेत की जी लहान मुलांनी (yoga for kids) आवर्जून केली पाहिजेत. तसंही आता लहान मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. याउलट अभ्यास, शाळा, ट्यूशन आणि उरलेल्या वेळेत स्क्रिन यामुळे मुलांचे बैठे तास वाढले आहेत. या गोष्टींमुळे मुलांना व्यायामाची गरज असून त्यांच्याकडून जर ही काही योगासनं नियमितपणे करून घेतली तर तब्येतीसोबतच त्यांच्या बुद्धीचाही विकास होईल.(how to increase concentration of children?)

 

मुलांसाठी आवश्यक योगासनं
१. वृक्षासन

मुलं हुशार आहेत, पण त्यांच्यात एकाग्रताच नसल्याने ते एका जागी शांत बसतच नाहीत, त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागतच नाही. अशी बहुतांश पालकांची तक्रार असते. अशा पालकांनी मुलांना दररोज नियमितपणे वृक्षासन करायला लावावे. अवघे मिनिटे- दोन मिनिटे हे आसन केले तरी त्यामुळे मुलांच्या एकाग्रतेत भरपूर फरक पडेल. वृक्षासन करताना लक्ष समोरच्या एखाद्या वस्तूवर केंद्रित करावे लागते. लक्ष केंद्रित केल्याशिवाय वृक्षासन करणे जमत नाही. त्यातून हळूहळू मन एकाग्र करण्याचा सराव होऊ लागतो आणि ही सवय अभ्यासात उपयोगी पडते. 

 

२. ताडासन
काही मुलं उंचीने ठेंगणी असतात. उंची कमी असणे, हे बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक असले तरी जर योगासनांच्या माध्यमातून योग्य प्रयत्न केले तर नक्कीच मुलांची उंची काही प्रमाणात तरी वाढण्यास मदत होते, हे नक्की. यासाठी मुलांना दररोज ताडासन करायला लावा. ताडासन करण्यासाठी दोन्ही हात वर घेऊन एकमेकांमध्ये बांधून घ्या. यानंतर टाचा उंच करा आणि पायाच्या बोटांवर संपूर्ण शरीराचा तोल सावरायचा प्रयत्न करा. या आसनामुळे उंची तर वाढतेच, शिवाय एकाग्रता वाढण्यासही मदत होते. 

 

३. सर्वांगासन
सर्वांगासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पाय वर उचला. आता हातांनी कंबरेला आधार द्या आणि कंबर, पाठ उचलण्याचा प्रयत्न करा. वर केलेले पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ही आसनस्थिती ३० ते ४० सेकंद टिकवावी. या आसनामुळे डोक्याला चांगला रक्तप्रवाह होतो, यामुळे बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

 

४. सुर्यनमस्कार
शरीर लवचिक होणे, पचनक्रिया मजबूत होते, स्नायुंना बळकटी देणे, अशा सर्व फायद्यांसाठी मुलांना नियमितपणे सुर्यनमस्कार घालायला सांगावेत.

 

Web Title: 4 types of yoga for children, that helps to increase their concentration, height and makes them physically strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.