Join us  

चाळीशीतही राहाल विशीप्रमाणे फिट; खाण्यापिण्याबाबत ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा, कायम दिसाल तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:03 PM

4 Ways to Look Younger After 40 : जर तुम्ही वयाची 40 वर्षे पूर्ण केली असतील तर तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं.

जसंजस वय वाढत जातं तसतसे शारीरिक, मानसिक बदल दिसायला सुरूवात होते. मेनोपॉजच्या काळात महिलांमध्ये प्रचंड बदल जाणवतात. तर प्रकृतीची योग्य काळजी न घेतल्यानं  कमी वयातच म्हातारपण आल्यासारखे वाटते. अशावेळी हाडं आणि स्नायू मजबूत राहण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणं गरजेचं आहे. (4 Ways to Look Younger After 40)

जर तुम्ही वयाची 40 वर्षे पूर्ण केली असतील तर तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. स्त्रिया अनेकदा घरातील कामाच्या नादात नाश्ता करणे वगळतात, ही एक अतिशय वाईट सवय आहे. दिवसभर उर्जेने परिपूर्ण राहण्यासाठी नाश्ता हे सर्वात महत्वाचे जेवण आहे. तुम्ही सकाळी 8 ते 9 दरम्यान नाश्ता केला पाहिजे. यामध्ये दूध, अंडी, फळे इत्यादींचा समावेश करावा.

या वयात कोणत्याही प्रकारचा ताण घेणे योग्य नाही. तणावामुळे रक्तदाब वाढू शकतो, कामवासना कमी होऊ शकते. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून चिंता, तणाव कमी होईल. चाळीशीनंतर जर तुम्हालाही फिट अॅण्ड फाईन राहायचं असेल तर तुम्ही ४ टिप्स वापरून तब्येत चांगली ठेवू शकता.  डॉ. अमृता कुलकर्णी यांनी फिट राहण्यासाठी आहारात बदल कोणते करायचे याबद्दल सांगितले आहे. 

१) आहारात मीठाचं प्रमाण कमीत कमी असावं. पापड, लोणचं, वेफर्स जास्त खाऊ नयेत.

२) आहारात फायबर्स आणि प्रोटीन्स यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन्स असावे. पालेभाज्या, फळं, डाळी, कडधान्य यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.

३) साखर, मैदा, प्रोसेस्ड फूड टाळण्याचा प्रयत्न करा. 

४) आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे संतुलन ठेवा.

याशिवाय हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुमच्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा समावेश करा. दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ यांचे सेवन करा. एका अभ्यासानुसार, 40 वर्षांच्या महिलांना दररोज सुमारे 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही पूरक आहार देखील घेऊ शकता.

स्वतःसाठी वेळ काढा. तुमचे छंद पूर्ण करा. मित्रांसोबत हँग आउट करा, बाहेर जा, चित्रपट पहा. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच स्वतःकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशा वेळी सकारात्मक विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न करा.

 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स