Lokmat Sakhi >Fitness > पोट सुटलं, कंबरेचा भाग वाढतो आहे? ४ उपाय - १ जरी नियमित केला तरी व्हाल लवकर स्लिम

पोट सुटलं, कंबरेचा भाग वाढतो आहे? ४ उपाय - १ जरी नियमित केला तरी व्हाल लवकर स्लिम

4 Ways To Lose Belly Fat and Overall body weight, According To Experts लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिमपेक्षा असरदार उपाय, ४५ मिनिटे करा हे ४ व्यायाम, वजन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 12:52 PM2023-04-18T12:52:11+5:302023-04-18T12:53:00+5:30

4 Ways To Lose Belly Fat and Overall body weight, According To Experts लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिमपेक्षा असरदार उपाय, ४५ मिनिटे करा हे ४ व्यायाम, वजन होईल कमी

4 Ways To Lose Belly Fat and Overall body weight, According To Experts | पोट सुटलं, कंबरेचा भाग वाढतो आहे? ४ उपाय - १ जरी नियमित केला तरी व्हाल लवकर स्लिम

पोट सुटलं, कंबरेचा भाग वाढतो आहे? ४ उपाय - १ जरी नियमित केला तरी व्हाल लवकर स्लिम

लठ्ठपणाची समस्या सध्या कॉमन झाली आहे. अधिकतर लोकं लठ्ठपणाच्या समस्येपासून त्रस्त आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, गेल्या ३० वर्षांत लठ्ठ लोकांची संख्या ३ पटीने वाढली आहे. सध्या २ अब्जाहून अधिक लोकं लठ्ठ आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, किडनी समस्या, मेंदूची समस्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. बरेच लोकं चरबी घटवण्यासाठी मेहनत घेतात. पण तरीही लठ्ठपणा कमी होत नाही. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा कमी करण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नसून, आहार आणि शारीरिक हालचालींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

यासंदर्भात, सर गंगाराम हॉस्पिटलमधील इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पॅनक्रियाटिक बिलीएरी सायन्सेसचे सल्लागार डॉ. श्रीहरी अनिखिंडी सांगतात, ''लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच, दररोज किमान ४५ ते १ तास शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे''(4 Ways To Lose Belly Fat and Overall body weight, According To Experts).

लठ्ठपणाचे कारण काय?

डॉ. श्रीहरी यांच्या मते, ''लठ्ठपणासाठी प्रामुख्याने दोन प्रकारचे फॅट जबाबदार असतात. एक त्वचेखालील चरबी आणि दुसरी व्हिसरल फॅट. त्वचेखालील चरबी त्वचेखाली साठली जाते. जे इतके हानिकारक नाही. पण पोटाखाली व्हिसेरल फॅट जमा होते, जे जास्त धोकादायक आहे. व्हिसेरल फॅट म्हणजे रेझिस्टन्स फॅट. जे लवकर वितळत नाही. दुसरीकडे, व्हिसेरल फॅटमुळे इन्सुलिनचा प्रतिकार देखील सुरू होतो. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. यासह ब्लड शुगरची समस्या देखील निर्माण होते.

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण शारीरिक हालचाली कमी करतो. दुसरे म्हणजे आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही. तिसरे, आपण अधिक ताण घेतो. ज्यामुळे आपण आपल्या आहारकडे लक्ष देत नाही. आपण आपल्या अन्नात जास्त कर्बोदके आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करतो. व प्रथिने कमी करतो. या दोन मुख्य कारणांमुळे शरीरात लठ्ठपणा वाढतो.

गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ, हार्ट राहेल सुरक्षित- बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी

४५ मिनिटांच्या व्यायामाने लठ्ठपणा होतो कमी

चालणे किंवा धावणे

डॉ. श्रीहरी म्हणतात, ''लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही, आपण इतर उपायांचा वापर करून वजन कमी करू शकता. यासाठी दररोज ४५ ते १ तास व्यायाम करा. यामध्ये जर तुम्ही पायी चालत असाल तर, तुमचा वेग कमीत कमी 6 किलोमीटर प्रति तास असावा. धावणे देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

एका आठवड्यात झटपट पोटावरची चरबी कमी करता येते का? डॉक्टर सांगतात, त्याचं एकमेव सिक्रेट

सायकल चालवणे

ब्रिस्क व्यायामामध्ये सायकल चालवणे खूप फायदेशीर ठरते. जर आपण ४५ मिनिटे सतत सायकल चालवत असाल तर, शरीराची अतिरिक्त चरबी घटते. हा व्यायाम नियमित करा.

बसून - बसून कंबरेचा भाग वाढलाय? २ सोपी योगासने, मलायका अरोराही सांगते त्यांचे फायदे

स्विमिंग

लठ्ठपणा कमी करण्यासाठी स्विमिंग उपयुक्त ठरेल. आपण जर जलद गतीने पोहत असाल तर, व्हिसेरल फॅट म्हणजेच पोटाची चरबी लवकर नष्ट होऊ शकते.

योग

योग शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारते. योगामुळे लठ्ठपणाही कमी होऊ शकतो. जे लोक खूप तणावाखाली राहतात, त्यांच्यासाठी योग सर्वात फायदेशीर ठरते. यासाठी मेडिटेशन फायदेशीर आहे.

Web Title: 4 Ways To Lose Belly Fat and Overall body weight, According To Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.