Lokmat Sakhi >Fitness > ३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

4 weight loss exercises to burn 500 calories in 30 minutes खूप व्यायाम केला तरी फार कॅलरी बर्न होत नाहीत असा अनुभव असेल तर हा व्यायाम करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 06:20 PM2023-04-06T18:20:06+5:302023-04-06T18:23:20+5:30

4 weight loss exercises to burn 500 calories in 30 minutes खूप व्यायाम केला तरी फार कॅलरी बर्न होत नाहीत असा अनुभव असेल तर हा व्यायाम करुन पाहा.

4 weight loss exercises to burn 500 calories in 30 minutes | ३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

वजन वाढणे ही एक गंभीर समस्या बनली आहे, जी केवळ आपले सौंदर्यच बिघडवत नाही तर, शरीरात मधुमेह, कर्करोग, कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देते. उत्तम आरोग्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी, अधिक कॅलरी बर्न करणे आणि चयापचय वाढवणे आवश्यक आहे.

पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ हरप्रीत यांच्या मते, ''तुम्ही जितके जास्त व्यायाम करण्यात सक्रिय असाल, तितक्या लवकर कॅलरीज बर्न करू शकता. जर तुम्हाला अर्ध्या तासात ४०० ते ५०० कॅलरीज बर्न करायच्या असतील तर, नियमित या व्यायामांना फॉलो करा''(4 weight loss exercises to burn 500 calories in 30 minutes).

वजन कमी करण्यासाठी प्रभावी मार्ग

स्क्वॅट्स

वजन कमी करण्यासाठी स्क्वॅट्स हा एक उत्तम व्यायाम मानला गेला आहे. हा व्यायाम नियमित केल्याने लोअर बॉडी टोन होते, नितंबांचे सर्व स्नायू मजबूत होतात. यासह हाडांची बळकटी वाढते. अनेक स्त्रियांना मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वेदनांचा त्रास होतो. पोटात क्रॅम्स येतात. हा त्रास कमी करायचा असेल, तर नियमित स्क्वॉट्स करा. हा व्यायाम दिवसातून निदान ४० वेळा करा.

स्किपिंग रोप

वजन कमी करण्यासाठी दोरी उड्या मारणे हा व्यायाम उत्तम आहे. रोज दोरी उड्या मारल्यामुळे जलद गतीने कॅलरी बर्न होतात. यासह शरीरातील मांसपेशी अधिक मजबूत होते. हा नियमित केल्यामुळे पाय, नितंब, खांदे, ओटीपोट आणि हात देखील मजबूत होतात. दिवसातून निदान १०० दोरी उड्या मारा.

क्रंचेस

पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस हा एक उत्तम व्यायाम आहे. जो मुख्य स्नायू, आणि ओटीपोटाच्या भागाची चरबी कमी करते. या व्यायामुळे अधिक कॅलरी बर्न होतात. किमान ३० वेळा तरी क्रंचेस करा.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ४ उपाय, बीपीही राहील नियंत्रणात

पुश-अप

वजन कमी करण्यासाठी पुश-अप हा व्यायाम महत्वाचा आहे. यामुळे स्नायू मजबूत होतात व शरीराची ताकद वाढते. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, हा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही मशीन किंवा उपकरणाची गरज नाही. जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी पुश-अप्स सर्वात उपयुक्त आहे. किमान ४० वेळा तरी पुश-अप्स करा.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

हे व्यायाम किती प्रमाणात करावे?

पोषणतज्ञ यांच्या मते, ''हे सर्व व्यायाम किमान अर्धा तास तरी करा उत्तम रिझल्टसाठी हे व्यायाम किमान पाच वेळा पुन्हा - पुन्हा करा. हे व्यायाम करण्याच्या आधी ट्रेनरचा एकदा सल्ला घ्या व त्याच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा.

Web Title: 4 weight loss exercises to burn 500 calories in 30 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.