Lokmat Sakhi >Fitness > लिव्हर ठणठणीत ठेवणारी ४ योगासनं, रोज १० मिनिटांचा हा योगाभ्यास डिटॉक्सही करतो- लिव्हरही उत्तम

लिव्हर ठणठणीत ठेवणारी ४ योगासनं, रोज १० मिनिटांचा हा योगाभ्यास डिटॉक्सही करतो- लिव्हरही उत्तम

4 Yoga Poses for Healthy Liver: शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकणे म्हणजेच बॉडी डिटॉक्स (body detox) करणे. हे काम नैसर्गिक पद्धतीने करून लिव्हरचे कार्य  सुधारण्यासाठी पुढील योगासने अतिशय फायद्याची ठरतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 07:03 PM2023-08-04T19:03:13+5:302023-08-04T19:03:54+5:30

4 Yoga Poses for Healthy Liver: शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकणे म्हणजेच बॉडी डिटॉक्स (body detox) करणे. हे काम नैसर्गिक पद्धतीने करून लिव्हरचे कार्य  सुधारण्यासाठी पुढील योगासने अतिशय फायद्याची ठरतात. 

4 Yoga poses for liver, Yoga for Healthy liver, How to keep liver healthy? Everyday 10 minutes exercise for liver | लिव्हर ठणठणीत ठेवणारी ४ योगासनं, रोज १० मिनिटांचा हा योगाभ्यास डिटॉक्सही करतो- लिव्हरही उत्तम

लिव्हर ठणठणीत ठेवणारी ४ योगासनं, रोज १० मिनिटांचा हा योगाभ्यास डिटॉक्सही करतो- लिव्हरही उत्तम

Highlightsलिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकानेच ही काही योगासने नियमितपणे केली पाहिजेत

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आहारात झालेल्या बदलामुळे लिव्हरच्या समस्या अनेकांमध्ये वाढल्या आहेत. त्या  समस्यांवर वेळीच उपाय करणे आणि मुळात त्रास उद्भवूच नये, लिव्हर नेहमीच ठणठणीत रहावे, यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे (How to keep liver healthy?). कारण वेगवेगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी लिव्हरची भूमिका अतिशय  महत्त्वाची ठरते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करणे, मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रीयंट्स, हार्मोन्सचा समतोल  राखणे ही लिव्हरची काही प्रमुख कार्ये आहेत. त्यामुळेच तर लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकानेच ही काही योगासने (4 Yoga poses for healthy liver) नियमितपणे केली पाहिजेत (Everyday 10 minutes exercise for liver). 

 

लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी मदत करणारी योगासने
१. भुजंगासन

हे आसन करण्यासाठी जमिनीवर पोटावर झोपा. कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात छातीच्या दोन्ही बाजूला ठेवा.

आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक

यानंतर श्वास घेत डोके, मान, छान, पोट वर उचला. असे करताना हात कोपऱ्यातून वाकलेले असावेत. ही आसनस्थिती २० ते २५ सेकंद टिकवून ठेवा.

 

२. अर्ध मत्स्येंद्रासन
दोन्ही पाय समोरच्या बाजूला पसरवून जमिनीवर ताठ बसा. उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि तो तळपाय डाव्या मांडीच्या बाजुला ठेवा. डावा तळपायही गुडघ्यातून वाकवा आणि उजव्या बाजूला वळवून ठेवा.

व्हिटॅमिन बी १२ खूपच कमी झालं आहे? ५ फळं नियमित खा, आहारतज्ज्ञ सांगतात, व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर..

आता उजव्या गुडघ्याला वळसा घालून डाव्या हाताने उजवा तळपाय पकडा. उजवा हात पाठीवर ठेवा. ही आसन स्थिती काही सेकंद टिकवल्यानंतर दुसऱ्या बाजुनेही असेच आसन करा.

 

३. धनुरासन
हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. पालथे झोपलेले असतानाच दोन्ही हात मागे घ्या आणि दोन्ही हातांनी दोन्ही तळपाय पकडण्याचा प्रयत्न करा. असे करताना मान, छाती आणि मांडी वर उचलण्याचा प्रयत्न करा.

 

४. त्रिकोणासन
ताठ उभे रहा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. कंबरेतून उजव्या बाजूने वाका आणि उजव्या हाताने उजवा तळपाय पकडण्याचा प्रयत्न करा. यावेळी डावा हात सरळ रेषेत वर उचला. काही सेकंद ही स्थिती टिकवल्यानंतर डाव्या बाजूनेही अशाच पद्धतीने त्रिकाेणासन करा. 

 

Web Title: 4 Yoga poses for liver, Yoga for Healthy liver, How to keep liver healthy? Everyday 10 minutes exercise for liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.