Lokmat Sakhi >Fitness > ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...

4 Yoga Poses to Reduce Extra Fat on Thighs : Yoga poses to reduce thigh fat : 4 Simple Yoga Asanas To Reduce Thigh Fat Naturally : 4 Powerful Asanas to get rid of Thigh fat Naturally at Home : जिम नको, घरीच ४ योगासनं करा, बेढब दिसणाऱ्या मांड्यांना मिळेल सुंदर आकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 19:10 IST2025-02-21T18:55:19+5:302025-02-21T19:10:46+5:30

4 Yoga Poses to Reduce Extra Fat on Thighs : Yoga poses to reduce thigh fat : 4 Simple Yoga Asanas To Reduce Thigh Fat Naturally : 4 Powerful Asanas to get rid of Thigh fat Naturally at Home : जिम नको, घरीच ४ योगासनं करा, बेढब दिसणाऱ्या मांड्यांना मिळेल सुंदर आकार...

4 Yoga Poses to Reduce Extra Fat on Thighs 4 Powerful Asanas to get rid of Thigh fat Naturally at Home 4 Simple Yoga Asanas To Reduce Thigh Fat Naturally | ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...

काहीवेळा आपल्या शरीरातील एका विशिष्ट भागांतील फॅट्सचे प्रमाण वाढते. यामुळे काही अवयवांवरील फॅट्सचे प्रमाण वाढल्याने आपल्या शरीराचा एकूणच आकार बेढब दिसतो. यातही महिलांमध्ये (4 Yoga Poses to Reduce Extra Fat on Thighs) कंबरेवर किंवा कंबरेच्या खालील भागात आणि मांड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणांत फॅट्स साचून राहते. दिवसभराचं बैठं काम, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यांमुळे शरीरावर चरबी वाढत जाते. काही जणांची (4 Simple Yoga Asanas To Reduce Thigh Fat Naturally) वाढलेली चरबी पोटावर जमा होते तर काहींची मांड्यांवर. एकदा ही चरबी साठायला लागली की ती कमी करणे हे मोठे आव्हान असते. बसून बसून मांड्यांवर चरबी साठली की मांड्यांचा आकार शरीरापेक्षा मोठा होतो आणि शरीराचा शेप बिघडतो. अशावेळी आपण जीमला जाणे, डाएट करणे असे एक ना अनेक उपाय करायला लागतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. मात्र नियमितपणे काही ठराविक योगासने केल्यास त्याचा मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो(4 Powerful Asanas to get rid of Thigh fat Naturally at Home).

मांड्यांची चरबी एकदा वाढली तर ते कमी करणं कठीण होतं पण रोजच्या जीवनात या संबंधित अधिक समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे जीन्स आणि कोणतेही वेस्टर्न कपडे सूट होत नाहीत. वजन वाढलं की ते कमी करणंही खूप महत्वाचे असते. मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनं करून मेंटेन शरीर मिळवू शकता. या योगासनांमुळे काही दिवसांतच तुमच्या मांड्यांचे पूर्ण फॅट कमी होईल. आता यासाठी नियमितपणे कोणती योगासनं करावीत ते पाहूयात. 

मांड्यांवरचे जास्तीचे फॅट्स होईल झटपट कमी... 

१. उत्कटासन :- हे आसन चेअर पोझ या नावानेही ओळखले जाते. हे आसन पाय, मांड्या आणि नितंब यांच्या स्नायूंसाठी उपयुक्त ठरते. या आसनात काल्पनिक खुर्चीत बसल्याने स्नायूंना नेहमीपेक्षा जास्त ताण येतो. यामध्ये पायांवर जोर येतो आणि नितंब आणि मांड्या यांच्यावरही ताण येतो आणि येथील चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे केवळ फॅट बर्न होतात असे नाही, तर पाय टोन होण्यासाठीही आणि मजबूत होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. 

भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

२. नौकासन :- नौकासन योग्य पद्धतीनं केल्यास तुमच्या मांड्याचे स्नायू मजबूत होतात. याशिवाय मांड्या, पोट यांवर जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट कमी होतं.  हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ झोपा त्यानंतर हळू हळू वर उठा. नंतर दोन्ही हातांना पायांनी  वर उचलून या अवस्थेत काहीवेळ राहा नंतर हळूहळू आधीच्या स्थितीत या. ही योगासनं केल्यानं मांड्यांचे फॅट कमी होईल. याव्यतिरिक्त  तुम्ही आजारांपासूनही दूर राहाल.

३. नटराजासन :- नटराजासन केल्यानं तुमच्या मांड्यांची चरबी कमी होऊ शकते. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ मुद्रेत उभे राहा. त्यानंतर पाय मागच्या बाजूनं खेचा त्यानंतर हातानं अंगठ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर या मुद्रेत 1 मिनिटं राहा त्यानंतर पुढच्या बाजूनं वाकण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या मुद्रेत राहिल्यानंतर सामान्य स्थितीत या.

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं...

४. वीरभद्रासन :- दिसायल अतिशय सोपे दिसणारे मात्र करायला थोडे कठिण असलेले हे आसन आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घेऊन एका पायात काटकोनात वाकावे. असे दोन्ही पायांनी, दोन्ही बाजूला करावे. या आसनामुळे मांड्या, पाय, नितंब अशा सगळ्यांवर ताण येत असल्याने मांड्यांची चरबी नकळत कमी होते.

श्वेता तिवारीचा फिटनेस ट्रेनर सांगतोय वजन कमी करण्याचा एकदम सोपा उपाय, शुगरही राहील नियंत्रणात...

Web Title: 4 Yoga Poses to Reduce Extra Fat on Thighs 4 Powerful Asanas to get rid of Thigh fat Naturally at Home 4 Simple Yoga Asanas To Reduce Thigh Fat Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.