आरोग्य उत्तम राहायचे तर आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत ठेवणे आवश्यक असते. मात्र आपण शरीराकडे दुर्लक्ष केले आणि चुकीची जीवनशैली अवलंबली तर मात्र हे अवयव खराब होत जातात आणि मग अडथळे निर्माण होतात. किडनी हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी महत्त्वाचे काम करत असते. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते. हे रक्त योग्य पद्धतीने घुसळून संपूर्ण शरीराला पोहचविणे आणि त्यातील अनावश्यक घटक मलमूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकण्यासाठी किडनी अविरत कार्य करत असते (4 Yogasana For Kidneys Health ).
पण याकडे आपण योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही तर किडनी खराब होते आणि शरीरातील अनावश्यक घटक वेळच्या वेळी बाहेर पडत नाहीत. त्याचा शरीरावर ताण यायला लागतो आणि आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात. किडनीतील फिल्टर खराब झाल्यास युरिक अॅसिड, अमोनिया, युरिया, क्रिएटीनिन, अमिनो अॅसिड, सोडियम, पाणी वाढते. याचा किडनीवर ताण येतो आणि मग नकळत इतरही अवयवांवर त्याचा ताण यायला लागतो. असे होऊ नये यासाठी आपला आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील इतर गोष्टींचे संतुलन असायला हवे. पाहूयात नियमित काही आसनं केल्यास त्याचा किडनीला कसा फायदा होतो.
१. सलंभ भुजंगासन
किडनी आणि यकृताचे काम चांगले राहावे यासाठी हे आसन नियमित करायला हवे. सकाळी किंवा संध्याकाळी किमान ५ मिनीटे हे आसन केल्यास किडनीचे कार्य सुरळीत राहण्यासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आणि पाठदुखी कमी होण्यासाठीही या आसनाचा अतिशय चांगला फायदा होतो.
२. नौकासन
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि किडनीच्या समस्या दूर होण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला फायदा होतो. तसेच ताण कमी होण्यासाठीही नौकासनाचा चांगला फायदा होतो.
३. पश्चिमोत्तानासन
दोन्ही पाय सरळ करुन दोन्ही हाताने पायाचे तळवे धरायचे आणि डोके गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. यामुळे किडनीचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.
४. सेतू बंधासन
सेतू बंधासनालाच ब्रिज पोझ असे म्हटले जाते. यामुळे पोटातील सर्व अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत होते. पायाचे तळवे, खांदे आणि मान यावर शरीराचा भार पेलायचा असल्याने पोटातील स्नायूं आणि अवयवांना ताण पडतो आणि त्यांचे कार्य सुधारते.