बऱ्याचदा असं होतं की आपल्याला व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही. किंवा काही लोक असे असतात ज्यांना तासनतास व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो. अशा लोकांसाठी एक मिनिटाचे ताडासन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. काही व्यायाम बराच वेळ करावे लागतात. पण त्याऐवजी १ मिनिटाचे ताडासन केले तरी ते बरेचसे शारिरीक त्रास कमी करण्यासाठी पुरेसे ठरते. ताडासन कसे करायचे (how to do tadasana or mountain pose?) आणि त्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात ते पाहूया..(5 amazing benefits of doing tadasana or Mountain Pose)
ताडासन कसे करायचे?
ताडासन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर योगा मॅट किंवा सतरंजी टाकून ताठ उभे राहा.
त्यानंतर तुमचे दोन्ही हात एकमेकांत बांधा आणि ते वर एका सरळ रेषेत घ्या.
हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम
आता दिर्घ श्वास घेत पायाचे घोटे उचला खांदे मागच्या बाजुने ओढल्यासारखे करा आणि शरीराचा सगळा भार पायाच्या बोटांवर घ्या.
नजर तुमच्या समोर असणाऱ्या एखाद्या वस्तूवर स्थिर करा आणि ही आसनस्थिती ५० ते ६० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्ही २ ते ३ वेळाही ताडासन करू शकता.
ताडासन केल्याने काय फायदे होतात?
IJRAR Research Journal यांनी केलेल्या अभ्यासानुसार पाठीच्या कण्यासाठी आणि बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ताडासन करणे फायदेशीर ठरते.
गुडघे आणि पायाचे घोटे मजबूत होण्यासाठी ताडासन करणे उपयुक्त ठरते. गुडघे दुखत असतील तर नियमितपणे ताडासन करावे.
मुलांचे पांढरे गणवेश काही दिवसांतच पिवळट- काळपट दिसतात? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखे चमकतील
काही जणींच्या नेहमीच पोटऱ्या दुखतात, ओढल्यासारख्या होतात. हा त्रास कमी करण्यासाठी ताडासन करावे.
एकाग्रता वाढण्यासाठीही ताडासन उपयुक्त ठरते. त्यामुळे मुलांनाही ते करायला लावावे.
ताडासन नियमितपणे केल्यास मुलांची उंचीसुद्धा वाढते.