व्यायाम फिट आणि एक्टिव्ह राहण्याचा एक उत्तम पर्याय आहे. (Fitness Tips) आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत लोक वर्कआऊट किंवा जिमसाठी वेळ काढू शकत नहीत. (Common Walking Mistakes You're Probably Making) अशा स्थितीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वॉक करणं हा उत्तम पर्याय आहे. काहीजण वजन कमी करण्यासाठी तर काहीजण पोट कमी करण्यासाठी रोज चालायला जातात. (Walking Mistakes You should avoid)
चालताना काही चुका केल्यामुळे हा व्यायाम करूनही त्यांना हवातसा परिणाम दिसत नाही. आपण अशा काही चुका करतो त्यामुळे नकारात्मक परिणाम होतो. चालण्यासाठी जिमला जाण्याची किंवा जड वजन उचलण्याची आवश्यकता नसते. सोपा व्यायाम करतानाही तुम्ही काही चुका करता ज्यामुळे पुरेपूर फायदा मिळत नाही. कोणत्या चुका आहेत ज्या चालताना टाळायला हव्यात समजून घेऊ. (Common Walking Mistakes and How to Fix Them)
चुकीच्या स्थितीत चालणं
चालल्याने शरीराला पुरेपूर फायदे मिळतात. म्हणूनच चालताना नेहमी पोश्चरकडे लक्ष द्या. चालताना पुढच्या बाजूला जास्त वाकू नका. ताठ उभं राहिल्याने, सरळ चालल्याने पाठीवरचा ताण-तणाम कमी होतो आणि तब्येतही चांगली राहते.
नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन
हात स्विंग न करणं
चालताना हात स्विंग म्हणजेच हात मागे पुढे हलवत राहायला हवेत. चालताना हात स्विंग केल्यानं तुमची चालण्याची क्षमता सुधारते. याशिवाय शारीरिक संतुलन चांगले राहते. वॉक करताना हात व्यवस्थित हलवा. यामुळे वॉकिंगचा शरीराला पुरेपूर फायदा मिळेल.
चुकीच्या फुटवेअर्सचा वापर
वॉक करताना चुकीच्या फुटवेअर्सचा वापर करणं नुकसानकारक ठरू शकतं. चालताना चांगल्या फिटींगचे फुटवेअर्स वापरा जे फार आरामदायक असतील. ज्यात चालताना कोणतीही अडचण येणार नाही. कारण जर तुम्ही पायाला आरामदायक वाटणार नाहीत असे शुज किंवा चपला चालण्यासाठी निवडाल तर रॅशेज, शू बाईज, जखमा होऊ शकतात. याशिवाय पायांच्या टाचा भरपूर दुखतात.
ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी
पाण्याची कमतरता
वॉकींगसारखे व्यायाम केल्यानं शरीराला पाण्याची गरज भासते. पाणी प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही. थकवा येत नाही आणि मांसपेशी चांगल्या राहतात. वॉकिंग करताना गरजेनुसार पाणी पीत राहा.
चालताना खाली पाहणं
अनेकजण चालताना मोबाईल पाहतात किंवा आजूबाजूला बघतात तर कधी आपल्या पायांना बघतात. या सवयी तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. असं केल्यानं पाठीवर अतिरिक्त दबाव येतो. चालताना पोश्चर व्यवस्थित राहण्यासाठी वाकून न चालता ताठ उभं राहून चाला.