Join us  

ताक आणि राजगिरा खाऊन सुटलेलं पोट कमी होईल? खा ५ गोष्टी, सोपा आहार - पाहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 11:28 AM

5 Belly Fat Burning Foods To Eat For A Slim Waist वाढलेलं पोट - कंबरेवरील चरबीने त्रस्त आहात? नियमित खा ५ पदार्थ, दिसेल फरक..

सध्या लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शरीराचे वजन नियंत्रणात न ठेवल्यास हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, टाईप 2 मधुमेह, स्ट्रोक, स्लीप एपनिया असे अनेक आजार आपल्याला घेरतात. ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होते. वाईट जीवनशैली व योग्य आहाराचे सेवन न करणे यामुळे शरीर बेढब दिसते. बरेच लोकं वजन कमी करण्याचे विविध मार्ग शोधत राहतात. वजन कमी करताना आपल्याला कमी खा असा सल्ला देखील मिळतो. पण आपण इतर पौष्टीक पदार्थ खाऊन सुद्धा वजन कमी करू शकतो.

यासंदर्भात, पोषणतज्ञ लवनीत बत्रा सांगतात, ''वजन कमी करण्याचा कोणताही सोपा - जादुई मार्ग नाही. वजन हे फक्त कॅलरीच्या कमतरतेने कमी होऊ शकते. जेव्हा आपण इनटेकपेक्षा जास्त कॅलरीज बर्न करतो. तेव्हा शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होतात, त्यामुळे पौष्टीक खा''(5 Belly Fat Burning Foods To Eat For A Slim Waist).

कॅलरीज बर्न करण्यासाठी खा हे पदार्थ

हिरवे अख्खे मुग डाळ

मूग डाळ प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे. हे खाल्ल्याने भूक शांत करणारे कोलेसिस्टोकिनिन हार्मोन वाढते. ज्यामुळे पोट अधिक कालावधीपर्यंत भरलेले वाटते, मुग डाळीमध्ये असलेल्या प्रथिनांच्या थर्मिक प्रभावामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

ताक

उन्हाळ्याच्या दिवसात ताक प्रचंड प्रमाणात प्यायले जाते. ताक कमी कॅलरीयुक्त पेय असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. भूक शांत करण्यासोबतच, या पेयामुळे पोट भरलेले वाटते. आपण ताक दुपारच्या जेवणासोबत पिऊ शकता.

व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा

चिया सीड्स

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.

रागी आणि राजगिरा

नाचणीमध्ये मेथिओनिन नावाचा अमीनो ऍसिडचा समृद्ध स्रोत आहे, जे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. दुसरीकडे, राजगिरामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे, हे दोन्ही पदार्थ भूक कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

काटेकोर डाएट व व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? ५ चुका टाळा, तरच घटेल वजन..

फुलकोबी

फुलकोबीसारख्या इतर भाज्यांमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात. प्रथिने, फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त फुलकोबी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य