दुसऱ्यांचं कौतूक करण्यासाठी तर आपण नेहमीच भरपूर टाळ्या वाजवतो. आता थोड्या टाळ्या स्वत:साठीही वाजवू या... आपण काही तरी चांगलं केलं आहे किंवा आपल्याला आपलं स्वत:चंच कौतूक करायचं आहे, म्हणून स्वत:साठी टाळ्या वाजवायच्या असं नाही.. तर आपली तब्येत चांगली रहावी म्हणून आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. क्लॅपिंग थेरपी (Benefits of clapping therapy in Marathi) म्हणजेच टाळ्या वाजविणे आणि त्या द्वारे उपचार ही पद्धती आता वेगाने लोकप्रिय होत चालली आहे. हा एक अतिशय साधा, सोपा आणि आपल्या वेळेेनुसार कधीही, कुठेही करण्यासारखा व्यायाम आहे. टाळा वाजविणे हे आरोग्यासाठी (clapping is important for health) चांगले असते हे तर आपण जाणतोच. पण त्याचे नेमके फायदे काय आहेत हे अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree) हिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहेत.
अभिनेत्री भाग्यश्री ही इन्स्टाग्रामवर (instagram) बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते. दर मंगळवारी भाग्यश्री तिच्या चाहत्यांना काही ना काही फिटनेस टिप्स (fitness tips by actress Bhagyashree) देत असते. या आठवड्यात भाग्यश्रीने क्लॅपिंग थेरपी म्हणजेच आरोग्यासाठी टाळ्या वाजविणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडियो (video) लहान असला तरी प्रत्येकासाठी खूपच उपयुक्त आहे. टाळ्या वाजवून जर घरबसल्या एवढे सगळे फायदे (Benefits of clapping therapy in Marathi) मिळणार असतील, तर काय हरकत आहे, हा प्रयोग करून बघायला.. भाग्यश्रीने सांगितलेले टाळ्या वाजविण्याचे फायदे
१. शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो (mental and physical health)
जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा हातावरचे प्रेशर पॉईंट एकमेकांवर दाबले जातात आणि ॲक्टीव्ह होतात. यामुळे सकारात्मक भावना वाढीस लागते अणि मनावर आलेली मरगळ, शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. क्लॅपिंग थेरपी नियमित केल्यामुळे शरीरातील हॅप्पी हार्मोन्स प्रवाहित होतात आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो.
२. मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त (useful for mental health)
मनावरचा ताण कमी करण्यासाठी टाळ्या वाजविणे हा एक खूप सोपा आणि स्वस्तात होणारा मस्त उपाय आहे. यामुळे आपल्या मेंदूकडे सकारात्मक संदेश जाऊ लागतात आणि त्यामुळे नैराश्य, ताण विसरण्यास मदत होते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज काही वेळ टाळ्या वाजवल्यास खूपच चांगला परिणाम दिसून येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
३. हृदयासाठी उत्तम (beneficial for heart)
टाळ्या वाजवल्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग सुधारतो. त्यामुळे हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह वाढतो. म्हणूनच हृदयाचे कार्य सुधारून रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी टाळी वाजवण्याचा उपाय चांगला आहे. जे लोक खूप जोरात श्वास घेतात किंवा ज्यांच्या श्वासाच मोठा आवाज येतो, त्यांनी दररोज टाळी वाजवण्याचा उपाय करून बघायला पाहिजे. हा त्रास कमी होईल.
४. मुलांची आकलन शक्ती वाढते (improves grasping power of children)
मुलांची एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता म्हणजे आकलन शक्ती किंवा ग्रास्पिंग पॉवर वाढविण्यासाठी क्लॅपिंंग थेरपी उपयुक्त ठरते असे सांगितले गेले आहे. यामुळे लहान मुलांकडूनही दररोज ५ मिनिटे टाळ्या वाजविण्याचा व्यायाम करून घ्यायला काही हरकत नाही. यामुळे मेंदू तल्लख होतो आणि स्मरणशक्ती, आकलन शक्ती वाढते. लहान मुलांची एकाग्रता वाढण्यासाठीही क्लॅपिंग थेरपी उपयोगी आहे.
५. केस आणि त्वचेसाठीही उपयोगी (beneficial for hair and skin)
टाळ्या वाजवल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग सुधारतो. रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यामुळे, उत्तम पद्धतीने रक्ताभिसरण झाल्यामुळे त्वचा चमकदार होते. शिवाय केसांची मुळे देखील मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे केस आणि त्वचा यांचे आरोग्य सुधारण्यासाठीही टाळ्या वाजविण्याचा व्यायाम उपयोगी ठरतो.
क्लॅपिंग थेरपीची योग्य पद्धत
Proper method of clapping therapy
- क्लॅपिंग थेरपी सुरू करण्यापुर्वी म्हणजेच टाळ्या वाजविण्याआधी दोन्ही हातांच्या तळव्यांना खोबरेल तेल लावून अर्धा मिनिट हलक्या हाताने मसाज करा.
- तेल हातात जिरले की मग एक हात दुसऱ्या हातावर बरोबर जुळवून घ्या आणि टाळ्या वाजवा.
- ३ ते ४ मिनिटे तरी टाळ्या वाजवाव्या.
- सकाळच्या वेळी हा व्यायाम करायला वेळ मिळाल्यास अधिक उत्तम.