Join us  

टर्किश गेटअप एक्सरसाईज म्हणजे काय ? हा नवा ट्रेण्ड इतका चर्चेत का आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 8:00 AM

What are the benefits of Turkish get ups : टर्किश गेटअप एक्सरसाइज आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते, स्नायूं मजबूत करण्यास आणि गतिशीलता सुधारण्यास हे एक्सरसाइज प्रकार मदत करतात.

दररोज एक्सरसाइज करणे हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. आपले शरीर मजबूत करण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे. एक्सरसाइज करून आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या निरोगी राहू शकतो. सर्व प्रकारचे एक्सरसाइज आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात. काहीवेळा आपण शरीराच्या खास भागांसाठी किंवा अवयवांसाठी खास पद्धतीचे एक्सरसाइज करणे पसंत करतो. आपण काहीवेळा आपल्या शरीराच्या काही खास भागांसाठी विशेष एक्सरसाइज करणे पसंत करतो. आपल्या कमरेकडील भाग, हिप्स, मांड्या, पोट यांसारख्या भागात फॅट्सचे प्रमाण हे जास्त असते. अशावेळी या भागातील फॅट्स कमी करण्यासाठी खास या भागांवर लक्ष केंद्रित करणारे एक्सरसाइज करण्यावर जास्त भर देतो(Why the Turkish get-up is the most versatile exercise).

सध्याच्या काळात आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज ट्रेंड येऊ लागले आहेत. या फिटनेस ट्रेंडपैकी टर्किश गेट अप एक्सरसाइज हा एक नवा ट्रेंड आहे. यात आपल्या कमरेकडील भाग, हिप्स, मांड्या, पोट यांसारख्या भागांना योग्य तो शेप देण्यासाठी विशेष एक्सरसाइज केले जातात. टर्किश गेट - अप एक्सरसाइज (Turkish Get Up Exercise) करणे थोडे कठीण असू शकते, परंतु ते आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. फिटनेस कोच शुभ्रा सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टर्किश गेट - अप एक्सरसाइज करण्याचे फायदे सांगितले(5 Benefits of the Turkish Get-Up Exercise).

टर्किश गेट - अप एक्सरसाइज करण्याचे फायदे :- 

१. शरीराची गतिशीलता सुधारण्यास मदत होते :- टर्किश गेट - अप एक्सरसाइज केल्याने आपल्या शरीराची गतिशीलता आणि स्थिरता सुधारू शकते. हा एक्सरसाइज करत असताना, आपल्या शरीराच्या गतिशीलतेच्या मर्यादा ओळखा आणि त्या दुरुस्त करुन शरीराची स्थिती सुधारा.

२. शारीरिक ताकद वाढवण्यास फायदेशीर : - टर्किश गेट - अप एक्सरसाइज केल्याने आपली शारीरिक ताकद आणि स्थिरता सुधारण्यास फार मदत होते. हा व्यायाम करण्यासाठी, आपल्या शरीरातील मुख्य स्नायूंची गरज लागते. त्यामुळे असा एक्सरसाइज केल्याने शरीरातील स्नायू अतिशय बळकट होतात. तसेच स्नायूंची वाढ, विकास व त्यांच्यातील मजबूतपणा वाढवण्यास मदत होते. 

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

३. खांद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी :- खांद्याची स्थिरता व त्यातील मजबूतपणा सुधारण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या दुखापतीनंतर खांदा बरा होण्यासाठी, तसेच त्याची गतिशीलता आणि ताकद वाढवण्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर ठरतो. 

तुम्हाला पण वर्कआऊट पूर्वी चहा पिण्याची सवय आहे का ? चहाची तलफ लागलीच तर चहाला उत्तम पर्याय...

४. शरीराच्या अनेक भागांसाठी फायदेशीर :- टर्किश गेट - अप एक्सरसाइजमध्ये हिप हिंग्ज, लंग्ज आणि ओव्हरहेड प्रेस सारख्या एक्सरसाइजचा समावेश होतो, जे एकंदर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि आपल्या पायांतील स्नायूंची ताकद वाढवण्यास देखील मदत करते.

ट्रेडमिलवर चालावे की बाहेर मॉर्निंग वॉक ? फिट राहण्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर...

५. सगळ्या स्नायूंसाठी फायदेशीर :- टर्किश गेट - अप एक्सरसाइज आपल्या शरीरातील अनेक स्नायूंना एकाच वेळी लक्ष्य करण्यास मदत करतो. हा एक्सरसाइज केल्यामुळे पाठीचा कणा योग्य संरचनेत ठेवण्यासाठी आणि पाठीच्या स्नायूंची ताकद वाढविण्यात मदत करते.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स