Join us  

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 5:19 PM

5 benefits of walking after eating : कामामुळे व्यायामाला वेळ मिळत नसेल तर, जेवल्यानंतर १ गोष्ट तर आपण करूच शकता..

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम, डाएट आणि इतर काही गोष्टी करून वेट लॉस करतो (Weight loss tips). पण तरीही आपल्याकडून नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं (Health Tips). अशावेळी आपलं वजन का कमी होत नाही? असा प्रश्न निर्माण होतो. काही लोक जेवण केल्यानंतर हालचाल करीत नाही. बैठी जीवनशैलीमुळे आपण तासंतास एकाच जागी बसून असतो. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, आणि मग वजन वाढू लागतं. जर आपण डाएट आणि व्यायामही करत असाल तर, जेवणानंतर फक्त १० मिनिटे शतपावली जरूर करा(5 benefits of walking after eating).

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, 'जेवण केल्यानंतर चालल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. आपल्या पोटाचे स्नायू सक्रीय होतात. पाचक एन्झाईम्स योग्यरीत्या कार्य करतात. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते. पचनक्रियेत कोणतेही अडथळे येत नाहीत. शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रासही दूर होतो. 

शतपावली करण्याचे फायदे

- जेवण केल्यानंतर १० मिनिटे चालल्याने ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर शतपावली केल्याने इन्शुलिन सेन्सिव्हिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. ज्यांचे जेवल्यानंतर अचानक ब्लड शुगरची पातळी वाढते, त्यांनी नियमित चालावे. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

- जेवण केल्यानंतर १० मिनिटे चालल्याने कॅलरीज अधिक प्रमाणात बर्न होऊ शकतात. ज्यामुळे सुटलेलं पोट, थुलथुलीत मांड्या एकंदरीत वेट लॉससाठी मदत होऊ शकते.

- शतपावली केल्याने फिजिकल आणि मेंटल हेल्थला अनेक फायदे मिळतात. वॉक केल्याने स्ट्रेस कमी होतो. मानसिक शांतीमुळे आपला मूड सुधारतो.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

- खाल्ल्यानंतर चालण्याने हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे.

- जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. ज्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटते. शिवाय रात्रीच्या वेळेस उत्तम आणि शांत झोप लागते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स