वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Weight Loss). सध्या ही एक जागतिक समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण जिम, व्यायाम, योग करतो. शिवाय डाएटकडेही विशेष लक्ष देतो (Fitness). पण तरीही आपलं वजन कमी होत नाही. वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल होतात. असं का होतं? आपण नेहमी या गोष्टीचा विचार करतो.
वजन कमी करताना नकळत आपल्याकडून होणाऱ्या चुकांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. जर आपलं देखील वजन वाढत असेल तर, वेळीच या '५' चुकांवर लक्ष द्या. वेट लॉस करताना कोणत्या चुका टाळायला हव्या याची माहिती फिटनेस कोच राजेश यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे. वेट लॉस करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात पाहा(5 Common Mistakes When Trying to Lose Weight).
वजन कमी करताना '५' चुका टाळा
जेवण स्किप करणे
वेट लॉस दरम्यान, जेवण स्किप करू नका. बरेच जण वजन कमी होईल, या हेतूने जेवण स्किप करतात. पण असे करू नका. अधिक वेळ उपाशी राहिल्यानंतर आपण जास्त खातो. शिवाय चयापचय मंद होऊ शकते. स्नायूंच्या वाढीस अडथळा येऊ शकतो. त्यामुळे नेहमी नियमित आणि संतुलित आहाराचे सेवन करा.
सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..
भरभर वजन कमी करण्याकडे लक्ष देऊ नका
काही लोक भरभर वजन कमी करण्याच्या नादात बऱ्याच गोष्टी करतात. पण वजन कमी होत नसल्याचं पाहून, निराश होतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यावर लक्ष द्या.
कार्डिओवर लक्ष केंद्रित करणे
काही लोक फॅट लॉससाठी कार्डिओकडे अधिक लक्ष देतात. पण असे करू नका. स्ट्रेंथ ट्रेनिंगकडेही तितकेच लक्ष द्या. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू तयार होतात, जे अधिक कॅलरी बर्न करतात. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंगकडेही तितकेच लक्ष द्या.
अपुरी झोप
FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल
जेव्हा झोप कमी होते तेव्हा तुमचे शरीर जास्त ताणतणाव संप्रेरक तयार करते जे वजन कमी करण्यास अडथळा आणू शकतात. शरीराला ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.
कोल्डड्रिंक्स पिणे
साखरयुक्त पेय पिणं टाळा. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. आपण वेट लॉसदरम्यान, साखर खाणं किंवा पिणं टाळू शकता.