Join us  

व्यायाम - डाएट करूनही तिशीनंतर वजन कमी का होत नाही? ५ कारणं, वेळीच बदला नाहीतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 12:13 PM

5 Common Reasons You're Not Losing Weight after 30s तिशीनंतर पोट सुटते, वजन वाढते, पण कमी केल्यास लवकर कमी होत नाही असे का?

तिशीत पदार्पण करणाऱ्या लोकांमध्ये 'वजन काही केल्या कमी होत नाही, अशी तक्रार ऐकलीच असेल. लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनत चालली आहे. याला मुख्य कारणीभूत बिघडलेली जीवनशैली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयाच्या निगडीत समस्या, यासह इतर गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, तिशीनंतर वजन कमी करणे कठीण होऊन जाते. वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल घडतात. ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. जे डायटिंग आणि व्यायाम करूनही लवकर कमी होत नाही. तिशीनंतर वजन कमी करणे का कठीण होऊन जाते? तिशीनंतर वजन कमी करण्यासाठी काय करावे? कोणत्या चुका टाळाव्या? पाहूयात(5 Common Reasons You're Not Losing Weight after 30s).

वाढत्या वयाबरोबर स्नायू कमकुवत होऊ लागतात

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या तिशीनंतर दर १० वर्षांनी ३ ते ८ टक्के स्नायू कमकुवत होतात. याला सारकोपेनिया असे म्हणतात. वयाच्या तिशीनंतर आपल्या शरीराची हालचाल काही अंशी कमी होते. जर आपण नियमित व्यायाम करत नसाल तर, हाडे ठिसूळ आणि स्नायूंमध्ये कमजोरी येऊ लागते.

झटपट वजन कमी करायचंय? ५ गोष्टी करा - जिम लावायची गरज नाही इतका वाढेल फिटनेस

वाढता स्ट्रेस आणि शारीरिक क्षमता कमी होणे

वयाच्या तिशीनंतर सहसा लोकं करिअर, जॉब, लग्न, मुले, आणि भविष्याबद्दल चिंतीत असतात. ज्यामुळे साहजिक ताण हा वाढतोच. चाळीशीनंतर शारीरिक क्षमताही कमी होऊ लागते. ज्यामुळे हवे तश्या हालचाली आपल्याकडून होत नाही. अशावेळी वजन हे वाढतेच.

मेटाबॉलिज्म कमी झाल्यामुळे फॅट बर्न कमी होते

तिशीनंतर चयापचय क्रिया मंदावते. चयापचय ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे आपण वापरत असलेल्या कॅलरीज उर्जेमध्ये रूपांतरित होतात.  जर आपण या वयात चरबीयुक्त आहार घेत असाल तर, कमकुवत स्नायूंमुळे कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे शरीरात फॅट्स स्टोर होतात.

फक्त २१ दिवस करा ५ गोष्टी, वजन तर कमी होईलच दिसाल सुडौल आणि व्हाल झटपट फिट

लाईफस्टाईलमध्ये बदल

तिशीनंतर आपल्या लाईफस्टाईलमध्ये बरेच बदल घडतात. जसजसे कुटुंबीयांमध्ये सदस्य वाढत जातात. त्याप्रमाणे आपण आपला मोकळा वेळ, त्यांना देतो. ज्यामुळे हालचाली कमी होतात, व आपण एकाच रुटीनला फॉलो करण्यास सुरुवात करतो. या करणामुळे बहुतांश लोकांचे वजन वाढण्यास सुरुवात होते.

हार्मोन्समध्ये बदल

आपला फिटनेस आपल्या हार्मोन्सवर अवलंबून असतात. तिशीनंतर पुरुष आणि महिला दोघांमध्ये हार्मोनल बदल घडतात. ज्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते. अशा स्थितीत पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य