आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत बाहेर जाऊन वॉक करणं कठीण होतं. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही बाहेर न जाता घरातल्या घरात १० हजार पाऊलं चालू शकता. यासाठी तुम्हाला काही स्मार्ट टेक्निक्सचा वापर करावा लागेल. ज्यामुळे तुम्ही फिट आणि एक्टिव्ह राहाल. ५ जबरदस्त ट्रिक्स कोणत्या ते पाहूया. ज्यामुळे तुम्हाला तुमचे रोजचे चालण्याचे टार्गेट पूर्ण करता येईल. (5 Creative Ways To Achieve 1000 Steps Target Daily Inside The house)
1) फोनवर बोलताना बसून बोलण्याऐवजी उभं राहून किंवा चालून बोला हा एक प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे तुम्ही आपल्या स्टेप्स काऊंट वाढवू शकता. ऑफिसचे कॉल्स असो किंवा मित्र मैत्रिणींसोबतच्या गप्पा असो चालता चालता बोलणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
कुकरमध्ये फक्त २ शिट्ट्या काढून घरीच करा तूप; ५ मिनिटांत घरीच बनेल रवाळ-साजूक तूप
2) तुमच्या घरात मोठी बाल्कनी किंवा छत असेल तर सकाळी तुम्ही वॉक करू शकता. ज्यामुळे फक्त ताजी हवा मिळणार नाही तर नॅच्युरली ऊनसुद्धा मिळेल. पक्ष्यांचा आवाज आणि बहरलेलं वातारवण असल्यास तुमचा मूड चांगला राहील.
केस विरळ झालेत-वाढ खुंटली? डॉक्टर सांगतात हे ३ पदार्थ खा, १ महिन्यात लांब-दाट होतील केस
3) नाश्ता, लंच किंवा डिनरनंतर वॉक केल्यानं फक्त पचनक्रिया चांगली राहत नाही तर ब्लड शुगर लेव्हलही चांगली राहते. जेवल्यानंतर ५ ते १० मिनिटं वॉक केल्यानंतरही शरीर एनर्जेटीक राहण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही १० हजार स्टेप्सचं टार्गेटही पूर्ण करायला हवं.
4) डांन्स केल्यामुळे वर्कआऊटसुद्धा चांगला होतो. तुम्ही आपल्या आवडत्या गाण्यावर नाचू शकता आणि स्टेप्स काऊंट वाढवा. तुम्ही ऑनलाईन डान्स ग्रुप जॉईन करू शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगली कल्पना मिळेल. डांसिंग एक फुल बॉडी व्यायाम आहे ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
कुकरमध्ये फक्त २ शिट्ट्या काढून घरीच करा तूप; ५ मिनिटांत घरीच बनेल रवाळ-साजूक तूप
5) जर तुम्ही जास्तवेळ ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर थोडावेळ चालणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यामुळे फक्त स्टेप काऊंट वाढत नाही तर पॉश्चर आणि फिटनेस चांगला राहतो. काम करताना छोटे छोटे ब्रेक घ्या. ऑफिस किंवा घरात छोट छोटे ब्रेक घ्या ऑफिस किंवा घरात थोडावेळ वॉक करा.