दिवाळी म्हणजे समृद्धीचा, नावीन्याचा आणि उत्साहाचा सण. याच सणाला आपलं तम-मन-धन सगळं चांगलं राहावं यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो. पण आपण पुन्हा रोजच्या कामात अडकून जातो आणि व्यायामाकडे आपले दुर्लक्ष होते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने आणि ऋतूबदल होत असताना फिटनेसकडे लक्ष देत असाल तर तिने काही सोपे व्यायाम सांगितले आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनुष्काने या व्यायामप्रकारांचा एक व्हिडिओ शेअर केला असून हे व्यायाम नियमित केल्यास आपल्या शरीराच्या वरच्या भागाचा अतिशय चांगला व्यायाम होतो असे अनुष्का सांगते. रोज बैठं काम करुन आपली पाठ, मान, कंबर या गोष्टी अवघडलेल्या असतात. अशावेळी काही सोपे व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास त्याचा चांगला फायदा होतो (5 Easy Exercises For Fitness in Diwali by Anushka Parwani).
अनुष्का परवानी हे बॉलीवूडच्या फिटनेस विश्वातलं एक अग्रणी नाव. आलिया भट, करिना कपूर अशा बड्या स्टार्सच्या फिटनेस ट्रेनर म्हणून अनुष्का परवानी ओळखल्या जातात. त्या सोशल मिडियावरही बऱ्याच ॲक्टीव्ह असतात. या माध्यमातून त्या नेहमीच फिटनेस विषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून फिटनेससाठी त्या अतिशय सोपे आणि सहज कुठेही करता येतील असे व्यायामप्रकार या माध्यमातून शेअर करत आहेत. शरीराची लवचिकता वाढावी आणि स्नायू बळकट व्हावेत यासाठी त्या कोणते व्यायामप्रकार सांगतात पाहूया...
१. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घेऊन ते गोल, बाजूला आणि वेगवेगळ्या प्रकारे फिरवावेत. यातील सगळे प्रकार १५ वेळा करावेत.
२. हातावर चालत पुढे जायचे आणि पुन्हा तसेच मागे यायचे. हेही किमान १५ वेळा केल्यास कंबरेचा, हातांचा आणि पायांचा व्यायाम होण्यास मदत होते.
३. हाताचे पंजे आणि पायाचे चवडे टेकवून करण्यात येणारे प्लँकस- यामध्ये एकदा गुडघ्यावर टेकायचे आणि एकदा गुडघे उचलून टाचा टेकायच्या, असे १५ वेळा करायचे.
४. पायाचे तळवे आणि हाताचे तळवे टेकवून कंबरेतून वर-खाली होण्याचा व्यायाम १५ वेळा करावा. यामध्ये हात, पाय, कंबर अशा सगळ्यांना व्यायाम होतो.
५. फोरआर्मवर प्लॅक करणे