बहुसंख्य महिलांना डोकेदुखीचा त्रास होतो. आठवड्यातून एकदा तरी त्यांची डोकं दुखतंय अशी तक्रार असतेच. डोकं दुखायला लागलं की काहीजणी पटकन एखादी पेन किलर घेऊन टाकतात. पण अशा पद्धतीने वारंवार पेन किलर घेणं आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाही. त्यामुळे लगेच बरं वाटत असलं तरी आरोग्यावर खूप परिणाम होत जातात. त्यामुळे यापुढे जर कधी डोकं दुखू लागलं तर पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा (5 easy exercises to get relief from headache and migraine). यामुळे तुमचा त्रास कमी व्हायला निश्चितच मदत होईल. शिवाय ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास होतो, अशांचा त्रासही या व्यायामांमुळे कमी होऊ शकतो असं एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे.(instant home remedies to get rid of headache and migraine)
डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी व्यायाम
डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योगासनं उपयोगी पडू शकतात, याविषयीचा अभ्यास Statpearls या जर्नलमध्ये मांडण्यात आला असून तो हेल्थशॉट यांनी प्रकाशित केला आहे. त्यामध्ये सांगितलेले व्यायाम पुढीलप्रमाणे-
केस फार गळतात- कोंडा खूप झाला? जावेद हबीब सांगतात ४ उपाय, कोंडा जाऊन केस होतील हेल्दी- सुंदर
१. मानेचे स्नायू मोकळे झाले तर डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकताे. त्यामुळे मान दोन्ही बाजुने खांद्याच्या दिशेने वाकवून ताण द्या. असं दोन्ही बाजुने प्रत्येकी ५ ते ७ वेळा करा.
२. जमिनीवर पाय लांब करून बसा. यानंतर एक मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत कंबरेतून खाली वाका आणि हाताने तळपाय पकडण्याचा प्रयत्न करा. हे करताना डोके पायावर ठेवण्याचा प्रयत्न करा.
३. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी बालासन करणेही उपयुक्त ठरते. यामुळे डोक्याच्या भागात चांगला रक्तपुरवठा होतो आणि डोकदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते.
आवळ्याच्या चटपटीत पदार्थांची खास यादी! कोणताही पदार्थ खा आणि केस, त्वचा, आरोग्य उत्तम ठेवा..
४. मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी एखाद्या मिनिटासाठी अधोमुख श्वानासन करा. हा व्यायाम करण्यासाठी तळहात आणि तळपाय जमिनीवर टेकलेले असावे. बाकी शरीर वर उचलून ते त्रिकोणी आकारात येईल, अशा पद्धतीने आसनस्थिती करावी.
५. जमिनीवर मांडी घालून बसा किंवा मग खुर्चीवर बसूनही हा व्यायाम केला तरी चालेल. फक्त व्यायाम करताना पाठीचा कणा ताठ असावा.
१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल फेशियलसारखा ग्लो; फक्त १ टोमॅटो घ्या आणि त्वचेवर होणारी जादू पाहा
आता चेहरा खाली करा आणि हनुवटी छातीला टेकविण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती ५ ते १० सेकंदासाठी टिकवून ठेवा आणि असं ५ ते ७ वेळा करा.