Lokmat Sakhi >Fitness > सतत कॉम्प्युटर, मोबाइल पाहून मान-खांदे अवघडले? आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायाम

सतत कॉम्प्युटर, मोबाइल पाहून मान-खांदे अवघडले? आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायाम

5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani : कामातून थोडा ब्रेक घेऊन काही बेसिक स्ट्रेचिंग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 12:59 PM2024-09-30T12:59:53+5:302024-09-30T13:00:23+5:30

5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani : कामातून थोडा ब्रेक घेऊन काही बेसिक स्ट्रेचिंग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani : Are your neck and shoulders strained by constantly looking at computers and mobiles? Alia-Kareena's fitness trainer shares 5 easy exercises | सतत कॉम्प्युटर, मोबाइल पाहून मान-खांदे अवघडले? आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायाम

सतत कॉम्प्युटर, मोबाइल पाहून मान-खांदे अवघडले? आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायाम

झोपेतून उठल्यापासून आपल्यापैकी बहुतांश जणी ओट्यापाशी काही ना काही करत असतात. याशिवाय साफसफाई, घरातील इतर कामं आणि मग प्रवास. त्यानंतरही दिवसाचे ८-९ तास कॉम्प्युटरवर जातात. पुन्हा प्रवास आणि घरी आलं की पुन्हा स्वयंपाकाची तयारी. या सगळ्या धावपळीत आपल्याला काही गोष्टी लक्षातही येत नाहीत. पण रात्री बेडवर पडल्यानंतर किंवा सकाळी झोपेतून उठताना आपलं शरीर किती ठिकाणी ठणकतं याची जाणीव होते. पाठ, मान, खांदे, पोटऱ्या, तळवे हे अवयव प्रामुख्याने दुखत असतात. कॉम्प्युटर आणि मोबाइल यांच्या सततच्या वापराने मान आणि खांदे कधीकधी इतके अवघडतात की आपल्याला काहीच सुचत नाही. मात्र आपण तसंच काम करत राहतो (5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani). 

(Image : Google)
(Image : Google)

कालांतराने हे दुखणे वाढते आणि मग आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. असे होऊ नये यासाठी खुर्चीत बसल्या बसल्या किंवा कामातून थोडा ब्रेक घेऊन काही बेसिक स्ट्रेचिंग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रसिद्ध अभिनेत्री करीन कपूर आणि आलिया भट यांच्या फिटनेस तज्ज्ञ असलेल्या अंशुका परवानी यांनी आपल्या सोशल मिडिया हँडलवरुन नुकतेच मानेचे काही व्यायाम सांगितले आहेत. हे व्यायाम नेहमीचेच असले तरी त्यात थोडासा बदल केल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो.   

खांदे आणि मानेला आलेला ताण कमी होण्यासाठी...

१. कान खांद्याला लावणे हा व्यायाम वाटताना अगदी सोपा वाटतो. पण तो योग्य पद्धतीने केला तर आपल्याला मानेला आलेला ताण लक्षात येतो. यामध्ये मानेच्या शिरा ताणल्या जात असल्याने हा व्यायाम बसल्या बसल्या जरुर करावा.  

२. काम मानेलालाच लावण्याचा व्यायाम करायचा. पण तो करताना दुसऱ्या हाताने दुसरा खांदा खालच्या बाजुला खेचण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे आधीपेक्षा थोडा जास्त ताण येतो आणि याठिकाणच्या ताण आलेल्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते. 

३. मान वर आणि खाली करणे हेही आपण बरेचदा करतो. पण ते करताना थोडा हाताचा सपोर्ट द्यायचा, त्यामुळे ताण योग्यप्रकारे पडतो आणि मानेचे दुखणे कमी होण्यास मदत होते. 

४. मान डावीकडे आणि उडवीकडे फिरवायची. यामुळे मान आणि खांद्याला जोडणाऱ्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते. किमान १५ वेळा हे केल्यास मानेला आलेला ताण नक्कीच कमी होतो. 

५. एक हात खालच्या बाजुने आणि एक हात वरच्या बाजुने घ्यायचा आणि दोन्ही हात एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे अवघडलेले खांदे मोकळे होतात. 

 


Web Title: 5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani : Are your neck and shoulders strained by constantly looking at computers and mobiles? Alia-Kareena's fitness trainer shares 5 easy exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.