Lokmat Sakhi >Fitness > अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर

अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर

5 Effective exercises to reduce arm fat :लटकणारं फॅट कमी करण्यासाठी आणि हातांना योग्य आकार देण्यासाठी तुम्ही असे काही व्यायाम प्रकार निवडू शकता. जे करण्यासाठी फार मेहनत लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 05:41 PM2023-08-31T17:41:46+5:302023-08-31T18:31:28+5:30

5 Effective exercises to reduce arm fat :लटकणारं फॅट कमी करण्यासाठी आणि हातांना योग्य आकार देण्यासाठी तुम्ही असे काही व्यायाम प्रकार निवडू शकता. जे करण्यासाठी फार मेहनत लागणार नाही.

5 Effective exercises to reduce arm fat : Top Five Effective Exercises To Remove Arm Fat | अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर

अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर

पोटाची किंवा शरीराच्या कोणत्याही भागातील चरबी सहज कमी होते पण दंडाची चरबी वाढली की हात गुबगुबीत दिसतात आणि फॅट लटकताना दिसतं. दंडांची चरबी सहजासहजी कमी होत नाही. आर्म फॅट कमी करण्यासाठी जीम किंवा योगा क्लासला जाण्याची काही गरज नाही. घरच्याघरी फक्त १५ ते २० मिनिटं वेळ काढून तुम्ही टोन्ड आर्म्स मिळवू शकता. 
आर्म फॅट वाढण्याची अनेक कारणं असू सकता. (Top Five Effective Exercises To Remove Arm Fat)

ही समस्या पुरूष किंवा महिला कोणालाही उद्भवते. पण पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. लटकणारं फॅट कमी करण्यासाठी आणि हातांना योग्य आकार देण्यासाठी तुम्ही असे काही व्यायाम प्रकार निवडू शकता. जे करण्यासाठी फार मेहनत लागणार नाही. एक्सपर्ट्सच्या मते अनेक व्यायाम आहेत ज्यांचा रूटीनमध्ये समावेश करून तुम्ही दंडाची चरबी कमी करू शकता.  

यासाठी तुम्हाला जास्तवेळ द्यावा लागणार नाही. हे  व्यायाम केल्यानं पायाचे स्नायू मजबूत होतात.  हात आणि पायाबरोबरच कंबरेचं फॅट कमी होण्यासही मदत होते. जर तुम्हाला दंडाची चरबी जास्त वाढल्याचे दिसत असेल तर आहारात कार्ब्स, शुगरयुक्त पदार्थांचा जास्त समावेश करू नका. आर्म फॅट कमी करम्याासाठी शुगर कट डाऊन करा. व्यायाम आणि रूटीन चेकअप वेळेवर करा. 

१) कार्डिओ

हातांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कार्डिओ व्यायाम प्रकारांचा समावेश करू शकता. कार्डिओ अनेक व्यायाम प्रकारांचा समूह आहे. ज्यात रनिंग, जॉगिंग, जंम्पिंग, सायकलिंग या एक्टिव्हीजचा समावेश होतो. रिपोर्टनुसार धावल्याने आणि पोहोल्यानं आर्म फॅट कमी होण्यास मदत होते. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या हातांवर होतो.

२) पुशअप्स

हातांची चरबी कमी करण्यासाठीच्या घरगुती उपायांत पुशअप्सचा समावेश आहे. पुशअप्स  करताना शरीराचा पूर्ण भार  हातांवर येतो.  एका संशोधनानुसार पुश अप व्यायाम केल्यानं मांसपेशी टोन्ड होतात तुम्ही घरच्याघरी भिंतीला हात लावून वॉल पूशअप्ससुद्धा करू शकता.  यामुळे आर्म फॅट कमी होईल.

३) वेटलिफ्टींग

आर्म फॅट  घटवण्यासाठी वेट लिफ्टींगसुद्धा उत्तम व्यायाम आहे. या मोठ्या, लांब रॉडवर तुमच्या क्षमतेनुसार वजन ठेवून ती प्लेट वर उचला. यामुळे शरीर मजबूत होईल आणि चरबी  कमी होण्यास मत होईल. यामुळे चयापचनही वाढेल आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

४) प्लँक्स

प्लॅक्स करताना दोन्ही हातांना शरीराला जमिनीपासून वर उचलावं लागतं. यावेळी तुम्हाला तुमचं पोट आतल्या बाजूनं खेचावं लागेल. नियमित स्वरूपात श्वास घ्या आणि श्वास सोडत राहा. एका मेडिकल रिसर्चनुसार प्लँक केल्याने बॉटी फॅट कमी होते परिणामी शरीर स्लिम दिसते.

५) ट्रायसेप डिप्स

हातांची चरबी कमी करण्यासाठी ट्रायसेप्स डिप्स एक सोपा उपाय आहे. टेबल किंवा खुर्चीवर आधी बसा.  त्यानंतर तसेच उठून  दोन्ही हात खुर्चीला घट्ट पकडा. ट्रायसेप्सवर वजन देत वर-खाली या. या उपायानं हातांची चरबी भराभर घटेल आणि फरक जाणवेल.

Web Title: 5 Effective exercises to reduce arm fat : Top Five Effective Exercises To Remove Arm Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.