युरिक ॲसिड (Uric Acid) एक घातक उत्पादन आहे. जेव्हा शरीरात प्युरिनयुक्त पदार्थ जमा होतात तेव्हा युरिक ॲसिडचं प्रमाण वढतं. जास्त प्रमाणात मद्यपान करणं, रेड मीट, जास्तवेळ उपाशी राहणं यामुळे शरीरातील युरिक ॲसिड वाढू शकतं. (How to control uric acid)
युरिक ॲसिड वाढल्यास लहान लहान क्रिस्टल्स तयार होतात ज्यामुळे सांध्याना सूज आणि वेदना जाणवतात. यामुळे संधिवाताचा त्रास ही होऊ शकतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होईल. (5 foods for high uric acid that can help lower levels naturally)
केळी
केळी कमी प्युरीनयुक्त फळ आहे. हे व्हिटामीन सी चं चांगला स्त्रोत आहे. घरात कोणालाही गाऊटची समस्या असेल तर केळ्याचं सेवन करायला हवं.
लो फॅट दूध
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की कमी चरबीयुक्त दूध आणि कमी चरबीयुक्त दही तुमच्या यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास मदत करते. एवढेच नाही तर ते तुमच्या शरीरातून युरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करते.
कॉफी
कॉफी शरीरातील अशा एन्जाईम्सना निष्क्रीय करते जे प्युरिनचे उत्पादन वाढवतात. म्हणूनच कॉफीमुळे युरिक एसिड नियंत्रणात राहतं.
आंबट फळं
आवळा, लिंबू, संत्री, पपई आणि अननस यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हेच कारण आहे की त्यांच्या सेवनाने युरिक ॲसिडची पातळी नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.
फायबर्सयुक्त खाद्यपदार्थ
ओट्स, मिलेट्स, सफरचंद पिअर, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, काकडी, सेलेरी, गाजर आणि बार्ली यांसारख्या पदार्थांमध्ये सोल्यूबल फायबर आढळते. फायबरचे सेवन सीरम युरिक ॲसिड कमी करते.
भारतीय स्वयंपाकघरात तमालपत्र लोकप्रिय आहे. तांदूळ, डाळ इत्यादी कोणत्याही पदार्थाची चव आणि वास वाढवण्यासाठी हे अधिक प्रमाणात खाल्ले जाते. ही पाने युरिक ॲसिड सारख्या आरोग्याच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरतात.