Lokmat Sakhi >Fitness > ऑफिसात दुपारी जेवताना अजिबात खाऊ नयेत ५ पदार्थ, कामावर होईल परिणाम - वाढते सुस्ती

ऑफिसात दुपारी जेवताना अजिबात खाऊ नयेत ५ पदार्थ, कामावर होईल परिणाम - वाढते सुस्ती

5 Foods You Should Never Eat For Lunch : लंचमध्ये चुकूनही खाऊ नका ५ पदार्थ, वाढेल पोटाचा विकार, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 03:46 PM2023-09-13T15:46:40+5:302023-09-13T15:47:33+5:30

5 Foods You Should Never Eat For Lunch : लंचमध्ये चुकूनही खाऊ नका ५ पदार्थ, वाढेल पोटाचा विकार, कारण..

5 Foods You Should Never Eat For Lunch | ऑफिसात दुपारी जेवताना अजिबात खाऊ नयेत ५ पदार्थ, कामावर होईल परिणाम - वाढते सुस्ती

ऑफिसात दुपारी जेवताना अजिबात खाऊ नयेत ५ पदार्थ, कामावर होईल परिणाम - वाढते सुस्ती

सकाळचा नाश्ता, दुपारचं लंच, रात्रीचं डिनर वेळेवर केलं तर, शरीर तंदुरुस्त आणि आरोग्य चांगले राहते. परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खाण्या - पिण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत. ज्यामुळे शरीर लठ्ठ तर होतेच, सोबत अनेक गंभीर आजार देखील छळतात. जर उत्तम आरोग्य हवे असेल तर, अनहेल्दी पदार्थ टाळा.

द हेल्थ साईट.कॉमच्या मते, उत्तम आरोग्यासाठी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये असे काही पदार्थ खायला हवे, ज्यामुळे गंभीर आजार निर्माण होणार नाही. बहुतांश लोकं सकाळचा नाश्ता हेल्दी पदार्थ खाऊन करतात. पण लंच किंवा डिनरमध्ये फास्ट फूड अथवा अनहेल्दी पदार्थ खातात. दुपारच्या जेवणात हे ५ पदार्थ खाणं टाळा, अन्यथा वजन तर वाढेलच, सोबत अपचनाचा त्रासही होईल(5 Foods You Should Never Eat For Lunch).

लंचमध्ये खाऊ नका 'या' ५ गोष्टी

तेलकट पदार्थ

प्रत्येकाला मसालेदार, तेलकट पदार्थ खायला आवडते. समोसे, भजी, वडापाव, यासह इतर तेलकट पदार्थ आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. दुपारच्या जेवणात तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. यासह वजन देखील वाढू शकते. त्यामुळे तळलेल्या पदार्थांऐवजी फळे किंवा इतर आरोग्यदायी पदार्थ खा.

‘जवान’फेम अभिनेत्री नयनताराचे ६ फिटनेस रुल्स, तिशीनंतरही दिसते कमाल सुंदर

मैदा

अनेकांना दुपारच्या जेवणात चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे अनेकजण पराठे, नूडल्स, पास्ता, बर्गर, इत्यादी पदार्थ खाऊन पोट भरतात. हे पदार्थ मैदाचा वापर करून तयार केले जातात. ज्यामुळे पचनाच्या निगडीत त्रास होतो. त्यामुळे साखरयुक्त किंवा मैदायुक्त पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

सँडविच

अनेकदा हेल्दी म्हणून लंचमध्ये आपण सँडविच खातो. पण सँडविच करण्यासाठी वापरण्यात येणारा ब्रेड हा हेल्दी नसतो. ब्रेड मैद्याचा वापर करून तयार करण्यात येतो. मैदा आरोग्यासाठी चांगले नाही. यासह त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असू शकतात. यामुळे आपले आरोग्य बिघडते.

जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ५ फायदे, जुनाट काहीतरी म्हणून नाक न मुरडता चालून तर पाहा..

पॅटिस

काही लोकं लंचमध्ये पोट न भरल्यामुळे बटाटा पॅटिस खातात. काही बटाटा पॅटिस शिळ्या असतात. त्या गरम करून पुन्हा विकल्या जातात. शिळ्या पॅटिस खाल्ल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळे शक्यतो लंचनंतर किंवा लंचमध्ये बाहेरचे पदार्थ खाणं टाळा.

ज्यूस

अनेक जण लंचमध्ये ज्यूस पितात. मात्र, जेवल्यानंतर विकतचे ज्यूस प्यायल्याने पोटात गॅस होऊ शकते. कधीही ज्यूस पिताना स्वच्छतेकडे लक्ष द्या. काही वेळेस त्यात वापरण्यात येणाऱ्या बर्फ आणि पाण्यामुळे हिपॅटायटीस होऊ शकते.

Web Title: 5 Foods You Should Never Eat For Lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.