चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे सध्या प्रत्येक दुसरी व्यक्ती लठ्ठपणाची शिकार बनत आहे. मुख्य म्हणजे याला बिघडलेली जीवनशैली कारणीभूत ठरते. काहींचे शरीर सडपातळ पण पोटाचा घेर वाढत जातो. अनहेल्दी लाईफस्टाईल, तणाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी कारणांमुळे पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही लोकं नाश्ता स्किप करतात. परंतु, नाश्ता स्किप केल्याने वजन कमी होते का?
वजन कमी करायचं असेल तर, नाश्ता स्किप करू नका. नाश्ता स्किप केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. वेट लॉस व पोटाची चरबी कमी करायची असेल तर, नाश्त्यामध्ये काही बदल करणे गरजेचं आहे. हार्मोन आणि गट हेल्थ कोच आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी नाश्त्यामध्ये असे काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते(5 golden breakfast rules to reduce belly fat faster).
नाश्त्यात करा हे बदल
बेली फॅट कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. यासाठी नाश्त्यामध्ये प्रथिनांचा अधिकाधिक समावेश करा. नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेटाबॉलिज्म रेट वाढते. ज्यामुळे दिवसभर भूक लागत नाही, पोट भरलेले राहते. यासह शरीर फॅट बर्निंग मोडमध्ये जाते.
काटेकोर डाएट- भरपूर व्यायाम करुनही वजन कमीच होत नाही? कारण ५ चुका, त्या टाळल्या नाहीतर..
नाश्त्यामध्ये या प्रकारे प्रोटीनचा करा समावेश
- जर आपण पोहे खात असाल तर, त्यात थोडे शेंगदाणे, बीन्स किंवा स्प्राउट्स घाला. यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळतील. उपमा करताना देखील या गोष्टींचा समावेश करून तयार करा.
- जर आपण पराठा बनवत असाल तर, गव्हाच्या पिठात बेसन मिक्स करा. यासोबतच आपण त्यात स्टफिंगमध्ये पनीर, मटार किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ मिक्स करू शकता.
- डोसा - इडली खात असाल तर, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा.
स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा
- नाश्त्यामध्ये आपण लापशी खाऊ शकता. आपण लापशी दूध किंवा भाज्यांसोबत खाऊ शकता.
- ब्रेकफास्टसाठी पनीर हा बेस्ट ऑप्शन आहे, पनीरच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.