Lokmat Sakhi >Fitness > ५९ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मिलिंद सोमणच्या ५ सवयी; आजपासूनच सुरू करा-कायम फिट राहाल

५९ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मिलिंद सोमणच्या ५ सवयी; आजपासूनच सुरू करा-कायम फिट राहाल

5 habits of Milind Soman : या पद्धतीची बॉडी हवी असल्यास तुम्हाला हार्ड कोअर वर्कआऊट आणि स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावं लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:23 IST2024-12-08T13:54:02+5:302024-12-08T14:23:14+5:30

5 habits of Milind Soman : या पद्धतीची बॉडी हवी असल्यास तुम्हाला हार्ड कोअर वर्कआऊट आणि स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावं लागेल.

5 habits of Milind Soman who looks young at 59 How To Stay For Forever | ५९ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मिलिंद सोमणच्या ५ सवयी; आजपासूनच सुरू करा-कायम फिट राहाल

५९ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मिलिंद सोमणच्या ५ सवयी; आजपासूनच सुरू करा-कायम फिट राहाल

बॉलिवूड इंडस्ट्रीतील फिनेटस फ्रिक एक्टर, सुपरमॉडल आणि मोटिव्हेटर मिलिंद सोमण यांच्या फिटनेसला तोड नाही. वयाच्या  ५९ व्या वर्षीही ते आपला फिटनेस आणि लूक्समुळे कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांचे सिक्स पॅक्स, बायसेप्स आणि एकदम परफेक्ट लिन बॉडी आहे. या पद्धतीची बॉडी हवी असल्यास तुम्हाला हार्ड कोअर वर्कआऊट आणि स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावं लागेल (5 habits of Milind Soman who looks young at 59 How To Stay For Forever). मिलिंद सोमण यांच्या ५ सवयींमुळे तुम्ही परफेक्ट शेपची बॉडी मिळवू शकता. असं केल्यानं तुम्ही वयाच्या पन्नाशीतही हेल्दी, फिट बॉडी मिळवू शकता. (Fitness habits of Milind Soman)

मिलिंद सोमणचे फिटनेस सिक्रेट नेमके काय?

रनिंग

मिलिंद सोमण रोज अनेक किलोमीटर धावतात. त्यांचा फिटनेस  २५ ते ३० वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे. यासाठी हे कडक मेहनत करतात. अनेकदा त्यांनी मॅराथॉन रेसमध्येही सहभाग घेतला आहे.

भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी

मिलिंद  सोमण यांच्या मॉर्निंग हॅबिट्स

मिलिंद सोमन यांच्यासाठी फिट बॉडी मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी  साडे पाच वाजता उठायला हवं त्यानंतर दिवसाची सुरूवात रनिंगने करा. सुरूवातीला २ ते ४ किलोमीटर रनिंग करू शकता. नंतर हळूहळू स्टॅमिना वाढेल आणि तुम्ही लांबचे अंतर कव्हर करू शकाल.

धावण्याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या रूटीनमध्ये वर्कआऊटचा समावेश करू शकता. धावल्यानंतर मिलिंद सोमण जीममध्येही  खूप घाम गाळतात आणि वेट, कार्डिओ व्यायाम करतात. याव्यतिरिक्त फिटनेसमध्ये मेडीटेशनचीही काळजी घेतात.

पटकन दही लावण्याची खास पद्धत पाहा; चुकीच्या पद्धतीनं दही लावल्यास किडनी होऊ शकते खराब

फिटनेससाठी एक योग्य डाएट घेणं फार महत्वाचे असते. मिलिंद सोमण वर्कआऊट आणि रनिंग व्यतिरिक्त आपल्या फिटनेससाठी  नाश्त्याला नट्स, सिजनल फ्रुट्स आणि भूक लागल्यांनतर अन्हेल्दी पदार्थांऐवजी ड्राय फ्रुट्सचा समावेश करू शकता. 

तूपाचा आहारात समावेश करा

शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी गुड फॅट्स आवश्यक असतात. अशा स्थितीत तुम्ही तुपाचा आहारात समावेश करू शकता. यामुळे शरीराला हेल्दी फॅट्स मिळतात आणि तुमची स्किनसुद्धा ग्लो करते. मिलिंद नेहमी घरच्या  जेवणाला प्राधान्य देतात. त्यांना बाहेरच्या  जेवणापेक्षा घरचं जेवण फार आवडतं. 

Web Title: 5 habits of Milind Soman who looks young at 59 How To Stay For Forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.