आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून बसण्याला फार महत्व आहे. भारतीय बैठक हीच उत्तम बैठक आहे असे मानले जाते. पूर्वीच्या काळी पंगतीत बसून जेवण केलं जायचं. आपल्या घरातील काही वृद्ध आजी - आजोबा कोणतंही काम असो फरशीवर मांडी घालून बसून करायचे. परंतु बदलत्या काळानुसार जमिनीवर मांडी घालून बसण्याची पद्धत आता मागे पडली आहे. कधी - कधी प्रेस्टिज इश्यूमुळेदेखील अनेकांना जमिनीवर बसण्यास संकोच वाटतो. हल्ली आपली जीवनशैली अशी बनली आहे की आपला अधिकाधिक वेळ खुर्च्या आणि सोफ्यावर बसण्यात घालविला जातो.आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि खाण्यासाठी सुद्धा खुर्च्यांवर बसायला आवडते. खरंतर एका पायावर पाय ठेऊन आपण ज्या प्रकारे जमिनीवर बसतो ती केवळ एक बैठक नसून मुद्रा आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या या पद्धतीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. जमिनीवर बसण्याचे नक्की काय फायदे आहेत हे समजून घेऊयात. drvaralakshmi या इन्स्टाग्राम पेजवरून जमिनीवर बसण्याचे महत्वाचे फायदे कोणते याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे (5 Health Benefits of Sitting on the Floor).
नक्की काय आहेत फायदे ?
१. स्नायूंना बळकटी मिळते - जमिनीवर मांडी घालून बसल्याने पाय आणि कमरेतील स्नायू बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो. जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते. आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.
२. शरीराची मुद्रा सुधारते - ज्या लोकांची बसण्याची मुद्रा चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते.नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो. जमिनीवर बसल्यामुळे खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात यामुळे तुमची बसण्याची पद्धत किंवा मुद्रा सुधारते.
३. पचनक्रिया सुधारते - आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते. जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते.
४. दीर्घायुष्य लाभते - जर तुम्ही जमिनीवर बसून मांडी घालून जेवलात तर तुमचे आयुष्यमान वाढते. कारण जेव्हा आपण मांडी घालून जेवायला बसतो तेव्हा आपले पचन व्यवस्थित होते आणि जेव्हा पचन योग्य होते तेव्हा आपले संपूर्ण शरीर देखील चांगले कार्य करते. यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते.
५. सांधेदुखी पासून मुक्तता - तुम्हाला जर कंबर किंवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर जमिनीवर मांडी घालून बसण्याचा प्रयत्न करा. मांडी घालून जमिनीवर बसण्याच्या या प्रकियेत तुमच्या सांध्यांना व्यायाम मिळतो. व्यायामामुळे तुमच्या सांध्याची चांगली हालचाल होते. सांध्यांना योग्य हालचाल मिळाल्यामुळे त्यांच्या वेदना कमी होतात.