Join us

भेळ- मखाणे- खाकरा हेल्दी म्हणून भरपूर आणि रोज खाता? थांबा, रडायची पाळी येईल कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 18:58 IST

5 Healthy Packaged Snacks That Are Actually Unhealthy : Foods That Are Stated As Healthy On Labels But Aren't! : 5 Unhealthy Snacks You Might Think Are Good For You : पॅकेजिंग केलेले पदार्थ हेल्दी - पौष्टिक समजून खाताय, आरोग्यावर होईल वाईट परिणाम...

वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी आपण हेल्दी - पौष्टिक पदार्थ खातो. असे पौष्टिक किंवा हेल्दी पदार्थ खाताना दोन जेवणाच्या मध्ये जर भूक लागली तर काय खायचा असा प्रश्न पडतो. अशावेळी आपण काहीतरी हलकं - फुलकं पण पोटभरीच असं खाणं अधिक पसंत करतो. काहीवेळा भूक लागली की आपण पॅकेजिंग (5 Healthy Packaged Snacks That Are Actually Unhealthy) केलेले हेल्दी - पौष्टिक असणारे पदार्थ खातो. लेस ऑयली, शुगर फ्री, डाएट फ्री, प्रोटीन रिच, लो कॅलरीज असे नाव दिलेले चिप्स, भेळ, मखाणे, खाकरा असे पदार्थ खातो. परंतु खरंच हे पदार्थ तितके हेल्दी किंवा पौष्टिक असतात का ? (Foods That Are Stated As Healthy On Labels But Aren't!).

अनेकदा आपण बाजारांतून डाएटच्या नावाखाली हेल्दी आहेत म्हणून असे पॅकेजिंग केलेले अनेक पदार्थ खातो. परंतु तज्ज्ञांच्या मते, हेल्दी दिसणारे हे पॅकेजिंग   स्नॅक्स वारंवार खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असते. इंस्टाग्रामवर न्यूट्रिशनिस्ट सलोनी यांनी अशा काही हेल्दी स्नॅक्सबद्दल सांगितले आहे, जे आपण अनेकदा हेल्दी समजून (5 Unhealthy Snacks You Might Think Are Good For You) खातो, पण त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. असे कोणते पदार्थ आहेत जे दिसताना हेल्दी किंवा पौष्टिक दिसतात परंतु ते खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकतो. 

हे ५ पॅकेजिंग स्नॅक्स आहेत अनहेल्दी... 

१. इन्स्टंट भेळ :- अनेकदा आपण भूक लागली म्हणून किंवा टी - टाइम हेल्दी स्नॅक्स म्हणून पॅकिंग केलेली इन्स्टंट रेडिमेड भेळ खाणे पसंत करतो. ही भेळ तयार करण्यासाठी कुरमुरे आणि शेव यांचा वापर केला असल्याने आपल्याला ती हेल्दी भेळ वाटू शकते. परंतु असे नसून ही भेळ पॅकेजिंग करताना जास्त काळ चांगली फ्रेश टिकून राहावी यासाठी यात भरपूर मिठाचा वापर केला जातो. या भेळेतील जास्तीचे मीठ तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. ही पॅकेजिंग केलेली इन्स्टंट भेळ खाण्याऐवजी तुम्ही कुरमुरे आणि काही ताज्या भाज्यांचा वापर करून तुमची हेल्दी भेळ घरीच तयार करू शकता.

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...

२. मल्टीग्रेन चिप्स :- आजकाल चिप्स, वेफर्स खाण्यापेक्षा मल्टीग्रेन चिप्स अधिक आवडीने खाल्ले जातात. हे मल्टीग्रेन चिप्स तुम्हाला आरोग्यदायी वाटत असले तरी त्यांची चव आणि टेक्शचर टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह घातले जातात. याव्यतिरिक्त, हे तळण्यासाठी वनस्पती तेलाचा वापर केला जातो. या तेलात हाय कॅलरीज आणि फॅट्स असतात, त्यामुळे मल्टीग्रेन चिप्सऐवजी तुम्ही भाजलेले हरभरे खाऊ शकता. 

३. फ्लेवर्ड मखाणे :- आजकाल बाजारांत वेगवेगळ्या असंख्य फ्लेवर्सचे मखाणे अगदी सहज विकत मिळतात. माखणा आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. पण, पॅकेटमध्ये येणाऱ्या मखण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. १०० ग्रॅम मखण्यांमध्ये ४९० कॅलरीज असतात, असे फ्लेवर्ड मखाणे हेल्दी म्हणून भरपूर खाल्ले तर तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे बाजारात विकत मिळणारे पॅकेजिंग केलेले वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड मखाणे खाण्यापेक्षा तुमच्या डाएटमध्ये नॉर्मल साध्या मखाण्यांचा समावेश करावा. 

वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम...

४. खाकरा :- खाकरा हा गुजराथी नाश्ता संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे. खाकरा, फाफडा, ढोकळा या सगळ्या गोष्टी खायला खूप चविष्ट लागतात. पण पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असलेला खाकरा खूप चवदार आणि आरोग्यदायी वाटू शकतो, पण त्यात वनस्पती तेल मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये सोडियमचे प्रमाणही जास्त असते, ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असा खाकरा जास्त किंवा वारंवार खाल्ल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे बाजारातील पॅकेजिंग केलेला खाकरा खाण्याऐवजी घरीच तयार करून खा.   

५. इन्स्टंट पोहे :- आजकाल, पोहे हा भारताच्या प्रत्येक भागात खाल्ल्या जाणाऱ्या नाश्त्याच्या पदार्थांपैकी एक आहे, जो आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे. लोकांमध्ये पोह्यांची क्रेझ पाहून अनेक फूड कंपन्यांनीही इन्स्टंट पोहे तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे इन्स्टंट पोहे बनवण्यासाठी तुम्हाला फक्त त्यात गरम पाणी घालावे लागते. मात्र, हे इन्स्टंट पॅकेजिंग केलेले पोहे खऱ्या पोह्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. या इन्स्टंट पोह्यांमध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि मीठ जास्त प्रमाणात असते, ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इन्स्टंट पोहे खाण्यापेक्षा घरीच पोहे बनवून खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरु शकते. 

पॅकेजिंग केलेले स्नॅक्स हेल्दी दिसू शकतात आणि चवीला स्वादिष्ट असतात. परंतु ते हेल्दी आहेत असे समजून खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा  नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे पॅकेज केलेले हेल्दी स्नॅक्स खाण्याऐवजी ताजे आणि घरगुती स्नॅक्सचे पदार्थ भरपूर खाणे अधिक फायदेशीर ठरु शकेल.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्न