Lokmat Sakhi >Fitness > आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल

आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल

5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight : वजन कमी करताना आता मन मारून जगण्याची गरज नाही, रोज खा ५ प्रकारचे हेल्दी स्नॅक्स; वजन वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 06:15 PM2023-11-28T18:15:28+5:302023-11-28T18:16:16+5:30

5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight : वजन कमी करताना आता मन मारून जगण्याची गरज नाही, रोज खा ५ प्रकारचे हेल्दी स्नॅक्स; वजन वाढणार नाही

5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight | आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल

आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल

वजन कमी (Weight Loss) करताना खरंच सगळ्याच गोष्टी नाकीनऊ येतात. आवडते पदार्थ न खाणे, व्यायाम करणे या गोष्टी नियमित केल्यानेच वजन कमी होते. मुख्य म्हणजे वजन कमी करताना डाएट फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. वाफाळलेल्या भाज्या खाऊन अनेकांना कंटाळा येतो. जर आपल्याला जीभेचे चोचले पुरवायचे असतील शिवाय, वजनही कमी करायचं असेल तर, आपण आपल्या डाएटमध्ये ५ स्नॅक्सचा समावेश करू शकता.

बरेच जण वजन वाढेल या भीतीने स्नॅक्स आहारातून वगळून काढतात. किंवा मसालेदार तळकट पदार्थांना ढुंकूनही बघत नाही. पण कधीकधी मनाचा ताबा सुटतो, आणि आपण उलट सुलट पदार्थ खातो. जर आपल्याला मनाची इच्छा न मारता काही तरी क्रंची, हेल्दी पदार्थ (Healthy snacks for Weight loss) खायचे असतील तर, आपण या ५ पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी हे पदार्थ उत्तम मानले जातात(5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight).

मखाना

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, मखाना खाण्याचे अनेक फायदे आहेत. भाजून जरी मखाना रोज खाल्ला तर, शरीराला कार्ब्स, प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सहज मिळतात. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय हे चवीला उत्तम व खाताना क्रंची लागतात.

डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

पोहा

महाराष्ट्रात नाश्त्यामध्ये प्रत्येक जण पोहे आवडीने खातो. पोहे हे एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, विटामिन्स असते. जर आपल्याला हेल्दी पोहे तयार करायचे असतील तर, त्यात शेंगदाणे, भाज्या घालायला विसरू नका. पोहे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

पिस्ता

तज्ज्ञ प्रत्येक ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. पण पिस्ता खाल्ल्याने वजन कमी करण्यास मिळते. पिस्त्यात फायबर आणि प्रोटीनसारखे पोषक घटक असतात. जे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, शिवाय वजनही झरझर घटते.

तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा

भाजलेले चणे

बरेच जण सायंकाळी छोटी भूक भागवण्यासाठी भाजलेले चणे खातात. त्यात प्रोटीन, फायबर, मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे आढळतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मुठभर चणे खाल्ल्याने पोटही दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होते.

पॉपकॉर्न

फक्त टाईमपाससाठी नसून, पॉपकॉर्न वजन कमी करण्यासही मदत करू शकते. पॉपकॉर्नमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी, शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असते. जर आपल्याला छोटी भूक भागवायची असेल, शिवाय चटकदार काहीतरी खायचं असेल तर, पॉपकॉर्न खा.

Web Title: 5 Healthy Snacks That Can Help You Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.