Join us  

रोज फक्त ५ मिनिटं कानाला मसाज करा, स्ट्रेस- छातीतली धडधड होईल कमी- पाहा भन्नाट युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 9:15 AM

5 Amazing Benefits Of Ear Massage: कानाला कोण मसाज करतं? करत नसाल तर आता करुन पाहा...

ठळक मुद्देजवळपास दोनशे प्रेशर पॉईंट्स आपल्या कानाच्या आसपासच्या भागात असतात.हे पॉईंट्स दाबल्यानंतर अनेक आजार कमी होण्यास मदत होते

बॉडी मसाज, हेड मसाज तुम्ही ऐकलं असेल पण इयर मसाज (ear massage) नावाचा प्रकार ऐकलाय का? आता हा प्रकार नेमका असतो तरी काय, ते पाहूया... आपल्याला माहितीच आहे की आपल्या शरीरात असे बरेच वेगवेगळे पॉईंट्स असतात ज्याला आपण प्रेशर पॉईंट्स म्हणूनही ओळखतो. हे पॉईंट्स दाबल्यानंतर अनेक आजार कमी होण्यास मदत होते. असेच जवळपास दोनशे प्रेशर पॉईंट्स आपल्या कानाच्या आसपासच्या भागात असतात. त्यामुळे आता कानाच्या आसपासच्या भागात कशा पद्धतीने मसाज करायची (How to do ear massage) आणि त्याचे काय फायदे (Benefits for ear massage) होतात, हे जाणून घेऊया...

 

कशी करायची कानाला मालिश?

हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या yogachal या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ४ प्रकारे कानांना मसाज करण्याचे सांगितले आहे.

ऐन पावसाळ्यात तुळस सुकली, पाने झडून चालली? ३ सोपे उपाय, तुळस पुन्हा बहरेल- होईल डेरेदार....

सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे तुमच्या हाताचे पहिले बोट आणि मधले बोट हे कानाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूने लावा आणि वर खाली याप्रमाणे चोळा. असे जवळपास १० ते १५ वेळा करा. 

 

दुसऱ्या व्यायाम प्रकारात तुमचे पहिले बोट आणि मधले बोट कानाच्या मागच्या बाजूने वरच्या भागात तर अंगठा खालच्या भागात लावावा आणि कान दाबावा.

तुम्हाला माहिती आहे का टाईमपास म्हणून मोबाईल बघत असताना कसं बसावं? योग्य पद्धत- पाहा व्हिडिओ

तिसऱ्या प्रकारच्या व्यायामात कानाची जी सगळ्यात बाहेरची बाजू आहे त्या बाजूला पूर्णपणे वर पासून खालपर्यंत पहिले बोट आणि अंगठा याने धरून हलके हलके दाब द्यावा. हे ४ ते ५ वेळा करावे.

चौथ्या व्यायाम प्रकारात कानाची वरची बाजू दोन बोटांमध्ये पकडून वर ओढावी.

 

कानाला मालिश करण्याचे फायदे 

१. हे सगळे व्यायाम तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. पण सकाळी उठल्यावर लगेचच केल्यास अधिक फायदा मिळेल. या व्यायामामुळे होणारा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे स्ट्रेस कमी होण्यास, एन्झायटी कमी करण्यास फायदा होईल.

खाल्लंय का कधी हिरव्यागार मिरचीचं झणझणीत आईस्क्रिम? बघा तेजतर्रार आईस्क्रिमची ही व्हायरल रेसिपी

२. मेंदूला उत्तमप्रकारे रक्तपुरवठा होण्यास मदत होते. त्यामुळे मरगळ निघून जाईल आणि फ्रेश वाटेल.

३. रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.

४. चेहऱ्यावर ग्लो येतो.

५. मन शांत होण्यास मदत होईल.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम