Join us  

रात्री अंथरुणावर पडताच टाचा ठणकतात? ५ मिनिटांचा १ सोपा उपाय अंथरुणावर बसूनच करा- टाचदुखी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 1:22 PM

Exercise To Reduce Heel Pain: टाचा एवढ्या ठणकतात की अक्षरश: झोप येत नाही, म्हणूनच हा एक सोपा उपाय बसल्या- बसल्याच करून पाहा...

ठळक मुद्देहा त्रास कमी असतानाच आटोक्यात आणायला हवा. नाहीतर मग टाचांचं दुखणं खूप वाढत जातं.

दिवसभर आपण आपल्या कामात असतो. सतत इकडून- तिकडे धावपळ करत असतो. त्यामुळे मग त्या गडबडीत टाचांचं दुखणं जाणवत नाही. किंवा थोडं- फार जाणवलं तरी आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण दिवसभराचं सगळं काम आटोपून आपण जेव्हा रात्री अंथरुणावर पाठ टेकतो, तेव्हा मात्र टाचा त्यांचं दुखणं वर काढतात आणि मग ठणकायला सुरुवात करतात. टाचेला नुसतं बोटाने हलकसं टोचलं तरी खूप त्रास होतो (5 Minutes exercise for Plantar fasciitis or heel pain). हा त्रास कमी असतानाच आटोक्यात आणायला हवा. नाहीतर मग टाचांचं दुखणं खूप वाढत जातं. (How to reduce heel pain?)

 

ज्या लोकांचं टाचांचं दुखणं खूप वाढलेलं असतं, ते लोक जेव्हा एका जागी काही वेळ बसून मग चालायला लागतात, तेव्हा त्यांना एक पाऊल पुढे टाकणंही कठीण होऊन जातं. कारण शरीराचा भार टाचांवर येताच त्या ठणकू लागतात.

कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर

मग काही वेळ लंगडत चालावं लागतं आणि त्यानंतर कुठे नीट चालता येतं. तुमचा टाचदुखीचा त्रास एवढा वाढू द्यायचा नसेल तर अगदी आजपासूनच हा एक सोपा व्यायाम करायला लागा. रात्री झोपण्याच्या आधी किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर कधीही तुमच्या सोयीने बसल्या बसल्याच हा व्यायाम करू शकता. 

 

टाचदुखीसाठी व्यायाम

टाचा दुखायला लागल्या असतील तर कोणता व्यायाम करावा, याविषयीचा व्हिडिओ pouya_yoga या इन्स्टाग्राम  पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

ऑक्टोबर हिटमुळे घरात खूप मुंग्या झाल्या? ४ सोपे उपाय- लाल मुंग्या घरात दिसणार नाहीत

हा व्यायाम करण्यासाठी ताठ बसा. दोन्ही पाय समोर पसरून ध्या. त्यानंतर एक पाय गुडघ्यातून वाकवून दुसऱ्या पायावर ठेवा. आता तळपाय हातात पकडा आणि एका हाताचे पायाची बोटे मागच्या बाजुने ताणून धरा.

त्यानंतर दुसऱ्या हाताची मूठ घालून संपूर्ण तळपायावर त्याने दाब देत ठोकल्यासारखे करा. एखादा मिनिट हा व्यायाम करावा.

त्यानंतर पायाची बोटे तशीच ताणलेली असू द्या आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने संपूर्ण पायाच्या मध्यभागावर प्रेशर द्या. ही क्रियाही २ ते ३ मिनिटे करा. टाचेचं दुखणं कमी होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामइन्स्टाग्राम