Lokmat Sakhi >Fitness > Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी

Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी

व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका कराल तर व्यायामाचा परिणाम होईल कमी; व्यायामानंतरची आहारपथ्यं महत्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 05:36 PM2022-06-13T17:36:14+5:302022-06-13T17:38:02+5:30

व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका कराल तर व्यायामाचा परिणाम होईल कमी; व्यायामानंतरची आहारपथ्यं महत्वाची!

5 Mistakes To Eat And Drink After Exercise will reduce workout benefits | Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी

Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी

Highlightsव्यायामानंतरचा आहार योग्य ठेवला तर व्यायाम केल्याचे दुप्पट फायदे शरीरास मिळतात. 

निरोगी आरोग्य, सुडौल बांधा, आजारंना प्रतिबंध यासाठी रोज व्यायाम करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. रोज अर्धा तास व्यायाम केला तरी शारीरिक आणि मानसिक आरोग्यास अनेक फायदे मिळतात. सुदृढ आरोग्यासाठी केवळ व्यायामच महत्वाचा असतो असं नाही तर व्यायामानंतरची आहाराची पथ्यंही महत्वाची. ती जर नीट पाळली तर केलेल्या व्यायामाचे दुप्पट फायदे मिळतात. पण व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या बाबतीत चुका केल्या तर मात्र व्यायामाद्वारे गाळलेल्या घामाचं चीज शून्य होतं. म्हणूनच व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या कोणत्या चुका करु नये हे समजून घेणं आवश्यक आहे. 

Image: Google

व्यायाम केल्यानंतरची आहार पथ्यं

1. व्यायाम केल्यानं वजन झपाट्यानं कमी व्हावं म्हणून काहीजण व्यायाम केल्यानंतर काहीच खात नाही. पण ही सवय चुकीची असल्याचं तज्ज्ञ सांगतात. व्यायामानंतर झालेली झीज भरुन काढण्यासाठी, स्नायुंची बांधणी होण्यासाठी शरीराला आहारातून इंधन मिळणं आवश्यक असतं. व्यायाम केल्यानंतरच्या आहारामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहातात आणि रक्तातील साखरही नियंत्रित राहाते. व्यायामानंतर काहीच न खाण्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. 

2. अर्धा ते एक तास व्यायाम केल्यानंतर काहीजण स्पोर्टस ड्रिंक पितात. तज्ज्ञ म्हणतात व्यायामानंतर अशा स्पोर्ट्स ड्रिंकची गरज नसते. व्यायामानंतर संतुलित आहार, प्रथिनंयुक्त नाश्ता आणि योग्य प्रमाणात पाणी यांची आवश्यकता असते. व्यायामानं कमी झालेले इलेक्ट्रोलाइटस परत मिळवण्यासाठी संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं पुरेसं असतं.  स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. शिवाय यात रंग ,स्वाद यादृष्टीने घटकही मिसळलेले असतात. असे स्पोर्ट्स ड्रिंक रोज व्यायामानंतर पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात.

3. व्यायाम केल्यानंतर कच्चं सलाड खाण्याची सवय अनेकांना असते. कच्चं सॅलेडमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असल्यानं पोटासाठी सॅलेड खाणं योग्यच. पण व्यायामानंतर सॅलेड खाणं ही सॅलेड खाण्याची योग्य वेळ नव्हे. व्यायामानंतर शरीराची ऊर्जा खर्च झालेली असते. सॅलेड पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. थकलेलं शरीर सॅलेड पचनासाठी योग्य ऊर्जा पुरवू शकत नाही. त्यामुळे सॅलेड नीट पचत नाही. यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. व्यायामानंतर भाज्याचं खायच्या असतील तर प्रथिनांची पावडर घातलेल्या स्मुदी घेणं योग्य असं तज्ज्ञ सांगतात. 

Image: Google

4. व्यायामानंतर पाणी कमी प्याल्यास गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. व्यायामादरम्यान शरीरातून भरपूर घाम निघतो. त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं.  व्यायामानंतर पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. व्यायामानंतर पुरेसं पाणी प्यालं नाही तर डिहायड्र्रेशनमुळे डोकं दुखणं, थकवा वाटणं, स्नायू दुखणं या समस्या निर्माण होतात. तज्ज्ञ व्यायामानंतर किमान 2 कप पाणी पिण्याचा सल्ला देतात. 

Image: Google

5. वजन वाढेल म्हणून व्यायामानंतर कर्बोदकांचं सेवन करणं टाळलं जातं आणि केवळ प्रथिनांचं सेवन केलं जातं. पण तज्ज्ञांच्या मते हे शास्त्रीय दृष्ट्या पूर्णपणे चूक आहे. कारण व्यायामानंतर जितकी प्रथिनांची गरज असते तितकीच कर्बोदकांचीही असते. कर्बोदकं हे शरीरासाठी इंधनाचं काम करतात. व्यायामानं खर्च झालेली ऊर्जा पटकन मिळवण्यासाठी कर्बोदकं आवश्यक असतात. त्यामुळे व्यायामानंतर प्रथिनं आणि कर्बोदकंयुक्त आहाराची गरज असते. 

Web Title: 5 Mistakes To Eat And Drink After Exercise will reduce workout benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.