Lokmat Sakhi >Fitness > ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

5 Mistakes To Avoid While Drinking Green Tea : चुकीच्या पद्धतीने ग्रीन टी प्यायल्याने फायदे होण्याऐवजी तोटेच जास्त होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 03:30 PM2023-05-22T15:30:34+5:302023-05-22T15:49:40+5:30

5 Mistakes To Avoid While Drinking Green Tea : चुकीच्या पद्धतीने ग्रीन टी प्यायल्याने फायदे होण्याऐवजी तोटेच जास्त होतात.

5 Mistakes You Should Stop Making To Get The Best Benefits Of Green Tea | ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

आपल्यापैकी काही लोकांच्या रोजच्या दिवसाची सुरुवात ही वाफाळलेल्या चहानेच होते. भारतातील सर्वाधिक लोक हे मसालेदार चहा पिण्याला पसंती देतात. परंतु, मागील काही वर्षांपासून कित्येक जण हे आरोग्याविषयी जागरुक झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी ग्रीन टी पिण्याला आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनवले आहे. ग्रीन टीमध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. ही पोषकतत्वे आपल्याला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत करतात. ग्रीन टी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ज्यामध्ये वजन कमी करण्यासोबतच हृदयविकार, त्वचेच्या समस्या आदी अनेक बाबतींमध्ये ग्रीन टी फायदेशीर ठरते. जेव्हा वजन कमी करायचे असते तेव्हाच ग्रीन टी पिण्याचा विचार आपल्या मनात येतो. ग्रीन टी प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर इतरही अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

ग्रीन टी घेण्याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी, आपल्या शरीराचा विचार करून आपण दररोज ग्रीन टी चे प्रमाण ठरवावे. जर आपण ग्रीन टी चे अधिक सेवन केले तर काही दुष्परिणाम देखील दिसू शकतात. वजन झपाट्याने कमी करायचे असेल, त्वचा चमकदार करायची असेल, पचनक्रिया सुधारायची असेल किंवा शरीरात ऊर्जेची गरज असेल तर ग्रीन टी चे सेवन आपल्या मनात सर्वात आधी येतो. परंतु काही लोकांना ग्रीन टी चे सेवन करण्याची योग्य पद्धत माहित नसते आणि ते पिताना काही चुका होतात. ग्रीन टी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. चुकीच्या पद्धतीने ग्रीन टी पिण्याने त्याचे फायदे मिळण्याऐवजी नुकसान होऊ लागेल आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिसू शकतात(5 Mistakes You Should Stop Making To Get The Best Benefits Of Green Tea).

ग्रीन टी पिताना हमखास होणाऱ्या या ५ चुका टाळा... 

१. रिकाम्या पोटी ग्रीन टी पिऊ नका :- काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते. अशावेळी ते लोक ग्रीन टी घेतात. जर आपण  सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी ने आपल्या दिवसाची सुरुवात केली तर ही चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरेल. खरं तर ग्रीन टी मध्ये टॅनिन असते, जे पोटात अ‍ॅसिड तयार करतात. त्यामुळे रिकाम्या पोटी ग्रीन टी चे सेवन करू नये. 

२. जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिऊ नका :- जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिऊ नये. जर आपण जेवण केल्यानंतर लगेच ग्रीन टी पिण्याची चूक करत असाल तर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक ठरू शकते. जेवणानंतर लगेच ग्रीन टी प्यायल्याने अन्नातून पोषक द्रव्ये मिळण्यात अडथळा निर्माण होतो. जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायल्याने खाल्लेल्या अन्नांतील लोह शोषणात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिण्यापेक्षा जेवणांनंतर १ ते २ तासांनी आपण आरामात ग्रीन टी पिऊ शकता.

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

३. झोपण्याआधी ग्रीन टी पिऊ नका :- ग्रीन टी मध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते, म्हणून जर आपण रात्री त्याचे सेवन केले तर त्याचा आपल्या झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या झोपेआधी  ग्रीन टी पिणे संपूर्णपणे टाळावे. झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टी पिण्याची चूक करू नका. 

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

४. जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे :- ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात, पण काही लोक त्याचे अतिसेवन करू लागतात. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच ग्रीन टी प्यावी. जर आपण ग्रीन टी चे जास्त प्रमाणांत सेवन केले तर यामुळे चिंता, निद्रानाश आणि पाचन समस्या उद्भवू शकतात.  

५. ग्रीन टी बॅगचा पुनर्वापर करणे टाळा :- काही लोक ग्रीन टी बॅगचा पुनर्वापर करतात. परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे, कारण चहाच्या पिशव्या पुन्हा वापरल्याने चहाची चव खराब होईल. ग्रीन टी मध्ये नेहमीच ताज्या पानांचा वापर करावा.

Web Title: 5 Mistakes You Should Stop Making To Get The Best Benefits Of Green Tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.