काहीवेळा एखादा दुःखद प्रसंग आला किंवा आपल्या मनासारख काही होत नसेल तर आपला मूड खूप खराब असतो. अशावेळी चीड चीड होणे, राग येणे, मूड स्विंग होणे यांसारख्या वेगवेगळ्या अवस्थांमधून आपण जात असतो. एखाद्या वेळी आपला मूड खराब किंवा चांगला असणे हे आपल्या शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असते. आपले आनंदी असणे, दुःखी होणे यांसारख्या सतत बदलत जाणाऱ्या मूडला आपल्या शरीरातील 'सेरोटोनिन' (Serotonin) नावाचा हार्मोन्स कारणीभूत असतो. या 'सेरोटोनिन' नावाच्या हार्मोनला 'हॅप्पी हार्मोन' या नावाने देखील ओळखले जाते.
जेव्हा आपल्या शरीरातील 'सेरोटोनिन' हार्मोन्सचे प्रमाण हे अगदी योग्य किंवा संतुलित असते तेव्हा आपण अगदी आनंदी असतो. आपण कोणत्याही प्रकारची चीड, चीड किंवा राग व्यक्त न करता अतिशय आनंदात असतो तसेच इतरांशी आपली वागणूक चांगली असते. याउलट सेरोटोनिन' हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित असेल किंवा बिघडलेले असेल तर आपण अतिशय दुःखी, उदास आणि चिडचिडे होतो. यामुळेच शरीरातील 'सेरोटोनिन' हार्मोन्सचे प्रमाण हे योग्य असणे खूपच महत्वाचे असते. यामुळे आपल्या शरीरातील 'सेरोटोनिनचे' म्हणजेच हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण कायम संतुलित ठेवण्यासाठी सोपे ५ उपाय कायम लक्षात ठेवूयात(5 Natural Ways To Boost Your Body’s ‘Happy Hormone’).
हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी काही सोपे उपाय...
१. एक्सरसाइज :- कोणत्याही प्रकारचा व्यायामामुळे हृदयाची गती वाढते. ही वाढलेली गती शरीरात आणि मनात सकारात्मक भावना निर्माण करते. कारण शारीरिक क्रियेमुळे सेरोटोनिनची निर्मिती वाढते. शरीरात तणाव किंवा वेदना निर्माण झाल्यावर सेरोटोनिन हे हार्मोन्स स्त्रवते. हे हार्मोन्स तणाव आणि वेदना कमी करून आपल्याला बरे वाटण्यास मदत करतात. दररोज अर्धा तास नियमित व्यायाम केल्याने आपण कायम आनंदी मूडमध्ये राहाल. यासाठी आपण दररोज एरोबिक्स, झुंबा, वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग असे वेगवेगळे एक्सरसाइज करू शकता.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....
२. पुरेशी झोप घ्या :- कोणत्याही व्यक्तीने किमान ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक असते, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. रात्री गाढ झोप घेतल्याने हार्मोन्स सक्रिय राहतात. यामुळे मूड चांगला आणि आनंदी राहतो.
सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...
३. कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घ्या :- सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आपल्या शरीरात सेरोटोनिन हार्मोन्स वाढवण्यास मदत करतो. या हार्मोनच्या मदतीने आपण आपला मूड दिवसभर चांगला ठेवू शकता. याशिवाय व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण होऊ शकते. आपला मूड वारंवार खराब होत असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हांत कमीत कमी ५ मिनिटे तरी सूर्यप्रकाशात उभे राहण्याचा प्रयत्न करावा.
सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...
४. योगा व मेडिटेशन करा :- मेडिटेशन करूनही मन आणि मन शांत राहते. यामुळे आपल्याला आराम वाटतो. त्यासोबत मेंदू चांगले काम करू लागतो. यामुळे सेरोटोनिनची पातळी वाढते आणि यामुळेच आपल्याला आतून आनंदी वाटते.
५. संतुलित आहार :- सेरोटोनिनचे संतुलन राखण्यासाठी आपल्या आहारात ट्रिप्टोफॅनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आपण आपल्या आहारात ब्राऊन राइस, दूध, चीज, व्हाईट ब्रेड, पायनॅपल यांचा समावेश करू शकता. यामुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढण्यात मदत होते.
६. मसाज थेरपी :- मसाज थेरपी घेऊन आपण आनंदी हार्मोन वाढवू शकतो. वास्तविक जर आपण मसाज थेरपी घेतली तर आपल्या शरीराला आराम मिळतो. आपले शरीर फार स्ट्रेस घेऊन थकलेले असेल अशा परिस्थितीत जर आपण मसाज केला तर आपल्या शरीराला आराम मिळतो यामुळे आनंदी हार्मोन्स सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढतात.