Join us  

कोण म्हणतं व्हेज पदार्थांत प्रोटीन नसतं? ५ पदार्थ आजपासूनच खा आणि वाढवा तुमचा प्रोटीन इनटेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 11:51 AM

5 Protein Rich Ayurvedic Herbs : शरीराला कॅल्शियम, व्हिटामीन्ससारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे प्रोटीन्सचीही आवश्यकता असते

प्रोटीन्स (Protein) एक महत्वाचा मायक्रोन्युट्रिएंट आहे जो शरीराच्या विकासासाठी महत्वाचा असतो. प्रोटीन्स शिवाय तुमचे मसल्स कमकुवत आणि थकल्यासारखे होण्याची शक्यता असते. प्रोटीन्स बॉडी टिश्यू बनवतात आणि शरीराला पोषण मिळण्यास मदत करतात. यामुळे हार्मोन कंट्रोल राहते आणि इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत होते. (5 protein rich ayurvedic herbs)

शरीराला कॅल्शियम, व्हिटामीन्ससारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे प्रोटीन्सचीही आवश्यकता असते. (Veg Protein Sources) प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे मांसपेशींचे नुकसान, थकवा, कमकुवतपणा, केस गळणं, त्वचा पातळ होणं, बीपी लो होणं, डायरीया यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

प्रोटीन्सची कमरता पूर्ण करण्यासाठी अशा खाद्यपदार्थांचे सेवन करायला हवे ज्यातून भरभरून प्रोटीन मिळेल. आयुर्वेद क्लिनिकचे डॉक्टर कपिल त्यागी यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना काही आयुर्वेदीक जडी बुटींबद्दल सांगितले आहे ज्यात प्रोटीन्स भरपूर असतात. (Ayurveda dr told 5 protein rich ayurvedic herbs for muscle growth and boost testosterone level)

अश्वगंधा

आयुर्वेदात अश्वगंधाला एक शक्तिशाली औषधी वनस्पती समजले जाते. अश्वगंधामुळे शरीरातील ताकद वाढण्यास आणि कार्डीओरेस्पिरेटरी फंक्शन सुधारण्यास मदत होते. अनेक संशोधनातून असं दिसून आलं आहे की अश्वगंधा शरीरातील ताकद आणि कार्डीओरेस्पिरेटरी फंक्शन सुधारण्यास मदत करतात. यामुळे टेस्टोस्टेरॉल लेव्हल वाढण्यास, मांसपेशींच्या विकासात आणि त्यांना बळकट करण्यात मदत मिळते.

शतावरी

शतावरी मांसपेशींच्या विकासासाठी एक उत्तम आयुर्वेदीक जडीबूटी आहे.  याचा वापर लैगिंक आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. यामुळे उर्जा वाढणं, मांसपेशींचा विकास आणि त्यांना मजबूत करण्याचीही क्षमता असते. यातील स्टेरॉयइल सॅपोईन टेस्टोस्टेरॉल लेव्हल वाढवते तर अमीनो एसिड शरीरातील प्रोटीन्स वाढवण्याचे काम करते. 

कडवट संत्री

गोड संत्र्याच्या तुलनेत कडवत संत्र्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. कडवट संत्र्यात अल्कलॉइड असते. जे मांसपेशींचे नुकसान न करता फॅट्स कमी करण्याचे काम करते. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि कॅलरीज बर्न होतात.

पांढरी म्यूसली

पांढली म्यूसली प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. आयुर्वेदात या वनस्पतींचा वापर पुरूषांचे यौन विकारांचा उपचार करण्यासाठी केला जातो.  यात टेस्टोस्टेरॉन लेव्हल वाढवण्याची क्षमता असते. मांसपेशींच्या विकासासाठी  पांढरी म्यूसली उत्तम पर्याय आहे. 

गोखरू

गोखरू हे आयुर्वेदिक औषधांमध्ये मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह आणि पुनरुत्पादक विकारांसह अनेक आरोग्य स्थितींवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. यात साइड इफेक्ट्स न जाणवता टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्याची क्षमता आहे. ही प्रथिने युक्त औषधी वनस्पती स्नायूंची ताकद देखील वाढवू शकते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स