साधारण एप्रिल - मे महिन्यात लग्नाची धामधूम सुरु होते (Weight Loss). या दरम्यान फिट दिसण्यासाठी आपण स्वतःची अधिक काळजी घेऊ लागतो (Fitness). स्किन केअर रुटीनपासून ते वेट लॉसपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतो (Lifestyle Changes). मुख्य म्हणजे वधू असो किंवा लग्नात हजेरी लावणारे मंडळी. आपण लग्नाच्या पेहरावात कसे सुंदर आणि हटके दिसू, यासाठी मेहनत घेतो. मुख्य म्हणजे वेट लॉसकडे बारकाईने लक्ष देतो. जर आपलं लग्न असेल किंवा इतर कार्यक्रमात आपल्याला फिट दिसायचं असेल तर, जीवनशैलीत आजपासून काही छोटे बदल करा. यामुळे वेट लॉस नक्की होईल.
याबद्दलची माहिती देताना योग प्रशिक्षक कुमार सौरव सांगतात, 'वजन कमी करणे ही एक कठीण प्रोसेस आहे. ज्यासाठी सातत्य आणि कठोर परिश्रम घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला एका आठवड्यात फरक पहायचा असेल तर, जीवनशैलीत काही बद्दल आजपासूनच करा. आहार आणि व्यायामाकडे बारकाईने लक्ष द्या. वेट लॉस नक्की होईल'(5 Small Changes You Can Make to Lose Weight Faster).
जीवनशैलीत करा ५ सोपे बदल
हायड्रेटेड रहा
वजन कमी करायचं असेल तर, आधी शरीराला हायड्रेट ठेवा. शरीर हायड्रेट राहिल्याने भूक कमी लागते. शिवाय चयापचय बुस्ट होते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, व खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते, आणि कॅलरीज जलद गतीने बर्न होतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण दररोज, पुरेशा प्रमाणात पाण्यासोबत नारळपाणी, रस इत्यादी पेय पिऊ शकता.
आहारातून कार्बोहायड्रेट वगळा
जर आपल्याला आठवडाभरात स्वतःमध्ये बदल पाहायचं असेल तर, आहारातून कार्बोहायड्रेट्स वगळा. जर एखाद्या व्यक्तीला आठवड्यात ०.५ ते ०.७ पर्यंत किलो वजन कमी करायचं असेल तर, ५०० ते ७५० कॅलरीज कमी खा. यासाठी लो कॅलरीज फूड खा. शिवाय लो कार्ब फूडचा आहारात सामावेश करा. मुख्य म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ खा.
फळ आणि भाज्या खा
वजन कमी करण्यासाठी फळे, सुका मेवा, वाफवलेल्या भाज्या, सूप, चीज आणि ताक यांचा आहारात समावेश करा. फळे शरीराला हायड्रेट करतात आणि आवश्यक पोषक तत्त्वे देतात. दुग्धजन्य पदार्थ प्रथिने आणि कॅल्शियम प्रदान करतात. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय वेट लॉससाठी मदत होते.
व्यायाम करा
वेट लॉस करण्यासाठी व्यायाम महत्वाचा. जॉगिंग, वॉकिंगव्यतिरिक्त आपण जिममध्ये वेट ट्रेनिंग घेऊ शकता. दररोज किमान ३० मिनिटे जॉगिंग करा. शरीरावर त्वरीत परिणाम दिसून येईल, व संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल. मुख्य म्हणजे ३० मिनिटे जॉगिंग केल्याने ५०० कॅलरीज बर्न होतात.
केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त
योग करा
जॉगिंग आणि व्यायाम व्यतिरिक्त आपण योगासने करू शकता. वेट लॉस आणि मेंटल हेल्थसाठी आपण सूर्यनमस्कार, धनुरासन आणि उत्कटासन ही योगासने करू शकता. यामुळे केस आणि स्किनमध्ये सकारात्मक बदल दिसतील.