कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज करण्याआधी व नंतर 'स्ट्रेचिंग' करणे देखील तितकेच महत्वाचे असते. एक्सरसाइज आणि स्ट्रेचिंग यांचे अनोखे नाते आहे. असे असले तरीही आपल्यापैकी कित्येकजण या स्ट्रेचिंगकडे लक्ष देत नाहीत. स्ट्रेचिंग केल्याने एक्सरसाइज दरम्यान होणाऱ्या दुखापतीचा धोका टाळला जातो. याचबरोबर शरीराची लवचिकता सुधारली जाते. ज्यामुळे शारीरिक हालचाली किंवा एक्सरसाइज करताना आपल्यातील सुधारणा स्पष्टपणे दिसून येतात. याव्यतिरिक्त, स्ट्रेचिंगमुळे स्नायूंचा रक्त प्रवाह देखील सुधारतो.
एक्सरसाइजनंतर 'स्ट्रेचिंग' करणे आणि कूल डाऊन होणे आवश्यक असते. 'स्ट्रेचिंग' केल्याने हेव्ही वर्कआउट्समधून शरीराची रिकव्हरी करण्यात मदत होते. जर वर्कआऊटनंतर थोडे वॉर्मअप एक्सरसाइज केले तर आपण शरीराचा कोणताही भाग सहजपणे स्ट्रेच करु शकतो, ज्यामुळे स्नायू शिथिल होतात. जर तुम्ही वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंग करत नसाल तर वर्कआऊट केल्यानंतर स्नायू दुखण्याची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे नेहमी स्ट्रेचिंग करा आणि शरीर कूल डाऊन करायला विसरू नका. वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंगचे अनेक फायदे होतात. स्ट्रेचिंग आपल्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात शंका नाही. मात्र, हे करत असताना काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे(5 stretching mistakes that can limit your range of motion and recovery).
स्ट्रेचिंग एक्सरसाइज करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ?
१. कंम्फर्ट लेव्हलपेक्षा जास्त स्ट्रेच करु नये :- अनेकदा आपण स्ट्रेचिंग करताना शरीराला अधिक ताणण्याचा प्रयत्न करतो. हे खरे आहे की स्ट्रेचिंग दरम्यान स्नायूंना थोडासा ताण जाणवू शकतो, परंतु स्ट्रेचिंग करताना स्नायूंमध्ये कधीही वेदना होऊ नये, याची काळजी घ्यावी. स्ट्रेचिंग करताना आपल्याला अस्वस्थ वाटत असेल किंवा शरीरात वेदना होत असतील तर अशावेळी थोडे कमी स्ट्रेच करावे. शरीर जास्त स्ट्रेच केल्याने देखील अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
आपल्या वयानुसार किती झोप रोज आवश्यक असते ? कमी झोप झाली तर...
२. खूप वेळा स्ट्रेचिंग करू नका :- इतर कोणत्याही व्यायामाप्रमाणेच स्ट्रेचिंगमुळे देखील आपल्या शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे जास्त स्ट्रेचिंग करणे देखील टाळावे. जर आपण दिवसभरातून शरीरातील एकाच भागातील स्नायूंच्या गटाला अनेकवेळा स्ट्रेच करत असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते.
फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...
३. एक्सरसाइजनंतर स्ट्रेचिंग करा :- आपण कोणत्या वेळी स्ट्रेचिंग करत आहात, त्याचा आपल्या शरीरावर आणि स्नायूंवरही खोल परिणाम होतो. स्ट्रेचिंग करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे एक्सरसाइजनंतर. वास्तविक, या काळात आपले शरीर एक्सरसाइज करुन उबदार असते आणि अशा स्थितीत आपल्यासाठी स्ट्रेचिंग अधिक आरामदायक ठरते. जेव्हा आपले स्नायू थंड असतात तेव्हा ते कमी लवचिक असतात, ज्यामुळे त्यांना ताणणे अधिक कठीण होते. याउलट जर आपण स्ट्रेचिंगपूर्वी एक्सरसाइज करत नसाल तर किमान ५ ते १० मिनिटे चालणे किंवा जॉगिंग यांसारख्या हलक्या कार्डिओ एक्सरसाइज सोबत वार्मअप नक्की करा.
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
४. बॉडी पोश्चरवर लक्ष द्यावे :- स्ट्रेचिंग करताना आपण आपल्या बॉडी पोश्चरवर लक्ष देणे गरजेचे आहे. आपण उभे राहून, बसून किंवा झोपून स्ट्रेच करत असाल, तर आपल्या बॉडी पोश्चरची काळजी घेतल्याने आपण योग्य प्रकारे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करु शकता. याचा शरीराच्या लवचिकतेवरही चांगला परिणाम होतो.
आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...
५. श्वास रोखून ठेवू नका :- अनेकवेळा स्ट्रेचिंग करताना आपण आपला श्वास रोखून धरतो, हे अतिशय चुकीचे आहे. आपण आपल्या शरीराचा एखादा विशिष्ट स्नायू ताणत असलात, तरीही यादरम्यान आरामात श्वास घेणे गरजेचे असते. स्ट्रेचिंग करताना श्वास रोखून ठेवू नका.