Lokmat Sakhi >Fitness > जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

What is the best thing to do after jogging to lose weight ? : व्यायाम तर आपण करतोच पण तो करतानाही काही चुकलं तर व्यायामाचा उपयोग कमी होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2023 06:20 PM2023-08-01T18:20:56+5:302023-08-01T18:42:55+5:30

What is the best thing to do after jogging to lose weight ? : व्यायाम तर आपण करतोच पण तो करतानाही काही चुकलं तर व्यायामाचा उपयोग कमी होतो.

5 Things To Do After Jogging May Support Weight Loss And Health. | जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

वजन कमी करण्यासाठी, फिट राहण्यासाठी तसेच व्यायाम म्हणून चालणे व जॉगिंग करणे हा सर्वात सोपा आणि अतिशय लोकप्रिय उपाय आहे. आपल्यापैकी काही लोक सकाळी किंवा संध्याकाळी जॉगिंग करतात. सकाळ संध्याकाळ जॉगिंग करणे हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. जॉगिंग केल्याने शरीरावरील चरबी घटण्यासाठी चांगलीच मदत होते तसेच दिवसभराची एनर्जी टिकून राहण्यासाठीही मदत होते.

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्हींचा समतोल असणे गरजेचा असतो. व्यायामामध्ये नेमके काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. मग कोणी जिम लावतात तर कोणी योगाचा क्लास लावतात, काही जण झुंबासारखा पर्यायही स्विकारतात. तर काही जण असे काहीच न करता आपल्या घराजवळच्या बागेत किंवा मैदानात जॉगिंगला जाणे पसंत करतात. कोणत्याही खर्चाविना आणि आपला आपण करण्याचा हा व्यायाम सोपा असल्याने त्याला प्राधान्य दिले जाते. जॉगिंग ही ऍक्टिव्हिटी आपण दररोज आवर्जून करतोच. परंतु वजन कमी करण्यासाठी जर आपण जॉगिंग करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जॉगिंगचा पूर्ण फायदा शरीराच्या तंदुरूस्तीसाठी करून घ्यायचा असेल आणि वजन कमी करायचे असेल तर या शारीरिक व्यायामानंतर नक्की काय करावे याबाबत यश फिटनेसच्या ट्रेनर यश अग्रवालने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत अधिक माहिती दिली आहे(5 Things To Do After Jogging May Support Weight Loss And Health).

जॉगिंग केल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात ? 

१. जॉगिंग केल्यानंतर काहीवेळ शांत बसा :- जॉगिंग करून जेव्हा आपण घरी येता तेव्हा एका जागी काही वेळ शांत बसावे. या दरम्यान काहीही करू नये. लक्षात ठेवा की कोणत्याही व्यायामानंतर शरीर हे अत्यंत उष्ण होते आणि रक्तप्रवाह वाढलेला असतो यामुळे श्वसनप्रक्रियादेखील वाढलेली असते. जर आपण धावण्याचा व्यायाम केला असेल आणि त्यानंतर लगेच काही काम करायला जाल तर उत्साही राहण्याऐवजी अधिक थकवा येतो. जॉगिंग केल्यावर शांत बसून स्वतःचे शरीर कूलडाऊन करावे. तसेच जॉगिंग (Jogging) करताना, ते अचानक थांबवू नये, शेवटची काही मिनिटे गती कमी करावी व त्यानंतर हळुहळु थांबावे. 

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

२. स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार करावेत :- ज्याप्रमाणे आपण व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करतो तसेच जॉगिंग केल्यानंतर तुम्ही मांसपेशी लवचिक बनविण्यासाठी स्ट्रेचिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. धावल्यानंतर शरीर हे गरम असल्यामुळे मांसपेशी खेचल्या जाता. त्यामुळे तुम्ही धावल्यानंतर स्ट्रेचिंग केल्याने लवचिकता टिकून राहाते. तसेच स्ट्रेचिंग केल्याने मांसपेशीत होणारा त्रासदेखील कमी होतो. याशिवाय वर्कआऊट केल्याने तणाव कमी होतो आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत मिळते.

आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...

३. शांत बसून पाणी प्यावे :- जॉगिंग केल्यानंतर शरीरातून खूप घाम निघून जातो. तसेच शरीर घाम निघून गेल्याने डिहायड्रेट होते आणि शरीरातील पाणी कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला चक्कर येणे अथवा थकवा येणे याला सामोरेही जावे लागू शकते. या सर्वांपासून वाचण्यासाठी तुम्ही शरीर थोडे कूलडाऊन झाल्यावर पाणी प्यावे. तसंच जॉगिंगनंतर शरीराला येणारा थकवा आणि घशाला पडलेली कोरड दूर करण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते. वर्कआऊटनंतर साधारण १ ग्लास पाणी प्यावे.

सकाळी उठल्या उठल्या ढसाढसा पाणी पिणं योग्य की अयोग्य ? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात, तसे करावे की नाही...

४. आंघोळ करावी :- जॉगिंगनंतर संपूर्ण शरीर घामाने भिजून जातं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होईपर्यंत शांत बसावं आणि नंतर आंघोळ करून घामाचे  कपडे बदलावे. तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार, जॉगिंगनंतर थंड पाण्याने आंघोळ करणं हे अधिक लाभदायक ठरतं. वास्तविक जॉगिंगनंतर प्रचंड थकवा आल्यामुळे थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीर त्वरीत रिकव्हर होण्यास मदत मिळते.

५. हेल्दी व पौष्टिक नाश्ता करावा :- वजन कमी करण्यासाठी जॉगिंग किंवा कोणताही अन्य व्यायाम करून झाल्यावर तळलेल्या, जंक फूड किंवा  आईस्क्रिमसारख्या पदार्थांवर ताव न मारता हेल्दी नाश्ता करावा. जंक फूड किंवा तेलकट खाण्याने वजन कमी होणे शक्य नाही. त्यामुळे काकडी, स्मूदीज, फळं. ड्राय फ्रुटस खाण्यावर अधिक भर द्यावा.

Web Title: 5 Things To Do After Jogging May Support Weight Loss And Health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.