Join us  

व्यायामाला वेळ नाही-तोंडावरही ताबा नाही? झोपण्यापूर्वी ५ गोष्टी करा; काही न करता वजन घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 3:20 PM

5 Things You Should Do at Night to Lose Weight : झोपण्यापूर्वी ५ नियम काटेकोरपणे फॉलो करा; वजन तर घटेलच - तब्येतही सुधारेल..

आजकाल बहुतांश जण वजन कमी करण्याच्या नादात आहेत (Weight Loss). कोरोना महामारीनंतर अजूनही काही जण वर्क फ्रॉम करीत आहेत. बैठी जीवनशैलीमुळे वजन वाढत जाते. वजन कमी करण्यासाठी आपण विविध गोष्टी करतो (Fitness). व्यायामशाळेत जाऊन घाम गाळतो, योग किंवा डाएटकडे अधिक लक्ष देतो (Health care). वजन कमी करण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं. पण तरीही नकळत घडणाऱ्या चुकांमुळे वजन कमी होत नाही.

तर काहींना व्यायामशाळेत जाऊन किंवा, व्यायाम करायला ठराविक मिळत नाही. जर आपलं देखील वजन कमी होत नसेल तर, रात्री ५ गोष्टी करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. विशेष जीवनशैलीत काही बदल आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करा. या ५ नियमांमुळे वजन घटवण्यास मदत होईल(5 Things You Should Do at Night to Lose Weight).

झोपण्यापूर्वी ५ गोष्टी करा, वजन घटेल

डिनर ७ वाजण्यापूर्वी करा

वजन कमी करण्यासाठी रात्री लवकर जेवणाची सवय लावा. जे लोक रात्रीचे ७ वाजण्याच्या आधी जेवण करतात, त्यांना वजन कमी करण्यास अडचण निर्माण होत नाही. जे काही आपल्याला खायचं आहे, ते ७ वाजण्यापूर्वी खा. तुमचे खाणे आणि झोपणे यात सुमारे ३ तासांचे अंतर ठेवा. रात्री उशिरा जेवल्यास अन्न पचत नाही आणि लठ्ठपणा वाढतो.

डाळ शिजत घालण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करता का? डाळ भिजत घालायला विसरता का? डाळ शिजत घालण्यापूर्वी...

रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा

रात्रीच्या जेवणात प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा. रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे लठ्ठपणा कमी होईल. रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या, सूप आणि डाळ- चपातीचा समावेश करा. यामुळे पोट भरेल आणि शरीराला जास्त कॅलरीज मिळणार नाही.

झोपण्यापूर्वी गरम पाणी

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या.  कोमट पाणी अन्न पचण्यास मदत करेल आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत करेल. गरम पाणी प्यायल्याने वजनही कमी होते. विशेषतः रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्यास त्याचा सर्वाधिक फायदा होतो.

हळदीचे दूध प्या

जर आपल्याला रात्रीची भूक लागली असेल तर, एक ग्लास हळदीचे प्या. रात्री हळदीचे दूध प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. हळदीचे दूध वजन कमी करण्यास मदत करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. शिवाय चांगली झोपही लागते.

ना पाणी - ना साबण; अवघ्या २ मिनिटांत कंगवा स्वच्छ करण्याची पाहा सोपी ट्रिक; कंगवा दिसेल नव्यासारखा

पुरेशी झोप घ्या

लठ्ठपणा कमी करण्यात झोपही महत्त्वाची भूमिका बजावते. झोपण्याआधी स्वतःपासून गॅझेट दूर ठेवा. झोपण्यापूर्वी काहीतरी वाचण्याची सवय लावा. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल. शिवाय चांगली झोपही लागेल. मुख्य म्हणजे वेट लॉससाठी मदत मिळेल. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स