वजन कमी करणं काही सोपं काम नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. तर अनेकदा स्ट्रिक्ट डाएट करतात तरी वजन कमी होत नाही (Weight Loss Tips). रोजच्या जगण्यात काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सहज वजन कमी करू शकता. (How To Loss Weight Weight Loss Tips) ज्यामुळे शरीराची चरबी कमी होते शरीर टोन होऊ लागते. (5 Tips To Lose Weight On Winter Season)
थंडीत वजन कसे कमी करावे
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार हे पाणी प्यायल्यानं मेटाॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. जेवणाआधी कोमट पाणी प्यायल्यानं पोट भरलेलं वाटतं ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि वजन कमी होण्यास मदत होते. कोमट पाणी प्यायल्यानं पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. ब्लोटींग, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो (Ref). जर तुम्ही दिवसभरात काहीही खाल्लं तर त्याच्या २० मिनिटांनंतर हलकं गरम पाणी पिऊ शकता. गरम पाणी पाणी प्यायल्यानं शरीरतील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते ज्यामुळे शरीरातील फॅट्स सहज बर्न होतात. गरम पाणी पित राहिल्यानं वजन कमी होण्याबरोबरच जास्त थंडी वाजत नाही.
सकाळची सुरूवात अशी करा
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी, जीऱ्याचं पाणी, मध आणि लिंबाचं पाणी किंवा चिया सिड्सचं पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते. हे वेट लॉस ड्रिंक प्यायल्यानंतर अर्ध्या तास काही खाऊ पिऊ नका.
मृणाल ठाकूरचे एलिगंट साडी लूक; ८ साड्यांचे खास कलेक्शन, तुम्हीही ट्राय करा-देखण्या दिसाल
वॉक करणं खूप महत्वाचं
हिवाळ्याच्या दिवसांत अंथरूणातून उठण्याचंही मन होत नाही. अशा स्थितीत व्यायाम करणं खूपच मोठं काम वाटतं. पण थोड्या प्रमाणात वॉक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ज्यामुळे शरीर योग्य आकारात येण्यास मदत होते. वॉक केल्यानं शरीर टोन होते. तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर २० मिनिटांनंतर वॉक करू शकता. जर तुम्ही रात्री एक तास वॉक करायला हवं. ज्यामुळे वेट लॉस भराभर होते.
झोप पूर्ण घ्या
हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी लवकर उठावं लागतं. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. पण तुम्ही ८ ते १० तासांची झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. झोपेच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिझ्म स्लो होतो आणि वजन वाढू शकतं. म्हणून रोज चांगली झोप घेणं आवश्यक आहे.
टोमॅटोत ३ पदार्थ मिसळून चटणी करा; इम्यूनिटी वाढेल-तोंडाला येईल चव, पाहा सोपी रेसिपी
खाण्यावर कंट्रोल
वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्यात काही बदल करायला हवेत. या वातावरणात पूरी, पराठे असे तेलकट पदार्थ खायला खूपच चांगले लागतात. म्हणून योग्य प्रमाणातच खा. जास्त सेवन केल्यानं वजनावर याचा परिणाम होऊ शकतो.