Join us  

स्ट्रेच इट 5 वेज, रोज करावेच असे स्ट्रेचिंगचे व्यायाम, फिटनेससाठी आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 5:06 PM

Fitness tips: व्यायामाचा कंटाळा किंवा मग व्यायाम करायला वेळच नाही... असं काही असेल तर किमान या ५ प्रकारच्या स्ट्रेचिंग (5 types of stretching) तरी नक्कीच करा....

ठळक मुद्देशरीराची लवचिकता कमी होत गेली की मग हालचाल नसल्याने मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे अनेक आजार डोकं वर काढतात. 

नव्या वर्षात प्रत्येक जण वेगवेगळे संकल्प करतो. यामध्येही बहुतांश लोक हे व्यायाम, फिटनेस या संदर्भात काहीतरी प्लॅनिंग ठरवतात आणि मग ते वर्षभर करायचेच, असा निश्चय करतात. यापैकी बहुतांश लोक असे असतात, ज्यांचं हे प्लॅनिंग वर्षभर काय पण अवघा महिनाभर किंवा आठवडाभर सुद्धा टिकत नाही. असं तुमचंही होणार असं वाटत असेल किंवा व्यायामाचा कंटाळा येत असेल, व्यायाम करायला खरोखरंच वेळ काढता येत नसेल, तर या ५ प्रकारचे स्ट्रेचिंग (importance of stretching in Marathi) तरी प्रत्येकाने केलेच पाहिजे असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) सांगत आहेत. 

 

आपलं वय जसंजसं वाढत जातं, तशीतशी आपल्या शरीराची लवचिकता कमी कमी होत जाते आणि आपण अधिकाधिक रिजिड होत जातो. वय कमी असताना जे व्यायाम आपण अगदी सहज करायचो, ते व्यायाम वाढत्या वयासोबत जमत नाहीत, हा प्रत्येकाचाच अनुभव असतो. शरीराची लवचिकता कमी होत गेली की मग हालचाल नसल्याने मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे अनेक आजार डोकं वर काढतात. 

 

शिवाय बसण्या- उठण्याच्या, चालण्याच्या, झोपण्याच्या, उभे राहण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही अनेकदा मान, पाठ, कंबर, पाय दुखतात. हे सगळं रोखायचं असेल तर दररोज ठराविक व्यायाम करायला पाहिजे. हा व्यायाम करायलाही जर तुम्हाला जमत नसेल, तर मात्र स्ट्रेचिंगचे हे ५ प्रकार नियमितपणे करा, असं दिवेकर यांनी सांगितलं आहे. ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्या स्ट्रेचिंगचे ५ प्रकार सांगत असून ते प्रत्येकाने दररोज करावेत असं त्या म्हणतात. 

स्टेचिंगचे ५ प्रकारलोअर बॉडीसाठी स्ट्रेचिंगचे प्रकार (stretching for lower body)प्रकार १.खूप वेळ जर उभं राहून तुमचं काम असेल तर तुम्हाला हॅमस्ट्रिंगचा त्रास होताे. हा त्रास वाढत जाऊन मग कालांतराने पाठदुखी आणि कंबरदुखी देखील सुरू होते. हा त्रास टाळण्यासाठीचा व्यायाम असा करा. सगळ्यात आधी दोन्ही हातांचे तळवे भिंतीला लावा. तुमच्या छातीच्या समांतर तुमचे हात भिंतीला असू द्या. यानंतर दोन्ही पाय मागे घ्या आणि मागे सरका. आता या अवस्थेत तुमचे हात पुर्ण सरळ असतील. कोपऱ्यात वाकलेले नसतील आणि पायदेखील गुडघ्यात वाकलेले नसतील. आता दोन्ही खांदे मागे ओढा आणि हळूहळू खाली वाका. भिंत, तुमचे हात आणि पाठ तसेच तुमचे पाय दोन्हीही एकमेकांशी ९० डिग्री कोनात असायला हवे. ही पोझिशन १५ ते २० सेकंद टिकवून ठेवा.

प्रकार २.एका बेडवर पाय खाली साेडून बसा. पाय सरळ करा. पाठीचा कणा ताठ ठेवून कंबरेतून खाली वाका. हाताने पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. अंगठे पकडता आले नाही तर पाय पकडा. १५ ते २० सेकंद हा स्ट्रेच करा. प्रकार ३.सरळ उभे रहा. दोन्ही पायातलं अंतर वाढवत न्या.. पायाची बोटे बाहेरच्या बाजूने करा. दोन्ही हात समोर करा आणि हाताची बोटे एकमेकांत घाला. पाय गुडघ्यातून वाकवा. खाली बेंड व्हा. पाठ सरळ ठेवा. १५ ते २० सेकंद ही अवस्था टिकवण्याचा प्रयत्न करा.

 

अप्पर बॉडीसाठी स्ट्रेचिंगचे प्रकार (stretching for upper body)प्रकार १दोन्ही हात खांद्याच्या रेषेत दोन्ही बाजूंना लांब करा. दोन्ही हाताचे तळवे तुमच्या मागच्या बाजूला करा. आता हात मागे नेत कोपऱ्यातून वाकवा आणि पाठीवर हाताची नमस्कार करण्याची पोझ करा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि १५ ते २० सेकंद ही अवस्था टिकवून ठेवा.प्रकार २हात सरळ वर करा. कोपऱ्यातन वाकवा आणि हाताचा तळवा पाठीला लावा. आता दुसऱ्या हाताने हाताचा कोपरा मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. १५ ते २० सेकंद ही अवस्था टिकवा. आता असाचा व्यायाम दुसऱ्या हाताने करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेव्यायाम