Lokmat Sakhi >Fitness > युरिक ॲसिडचा त्रास होतो, हिवाळ्यात नक्की खा ५ सिझनल ताज्या भाज्या

युरिक ॲसिडचा त्रास होतो, हिवाळ्यात नक्की खा ५ सिझनल ताज्या भाज्या

5 vegetables that can reduce uric acid level : हिवाळ्याच्या दिवसात पालकचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:26 PM2023-01-11T12:26:08+5:302023-01-11T17:00:50+5:30

5 vegetables that can reduce uric acid level : हिवाळ्याच्या दिवसात पालकचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं.

5 vegetables that can reduce uric acid level and gout risk according to arthritis foundation | युरिक ॲसिडचा त्रास होतो, हिवाळ्यात नक्की खा ५ सिझनल ताज्या भाज्या

युरिक ॲसिडचा त्रास होतो, हिवाळ्यात नक्की खा ५ सिझनल ताज्या भाज्या

शरीरात प्युरिन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात  तयार होतो तेव्हा युरीक एसिडचं प्रमाण वाढतं.  खाण्यापिण्यातील काही पदार्थांमुळे शरीरात प्युरिन तयार होतं. यामुळे शरीरात युरीक एसिडचं प्रमाण वाढतं. (How to control uric acid)  युरिक एसिड मुत्रमार्गातून शरीराच्या बाहेर पडतं पण जेव्हा किडन्या युरिक एसिड बाहेर काढण्यास असमर्थ असतात तेव्हा  हे पदार्थ  सांध्यांना चिकटतात आणि गाऊट नावाचा आजार होऊ शकतो.  ही स्थिती खूपच त्रासदायक असते. (Natural Ways to Reduce Uric Acid in the Body)

शरीरात युरिक एसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना,  हालचालीस त्रास जाणवतो यामुळे प्रभावित भागात सूज येते आणि पायांमध्ये वेदना  जाणवतात. युरिक एसिड लहान लहान दगडांच्या स्वरूपत असतात. किडनी स्टोनसह अनेक गंभीर समस्या यामुळे उद्भवू शकतात. (5 vegetables that can reduce uric acid level and gout risk according to arthritis foundation)

हिवाळ्यात युरिक एसिडची लक्षणं वाढतात. लोकांना सांधेदुखी जाणवते. हिवाळ्यात युरिक एसिडमुळे सांधेदुखी वाढते त्यामुळे काही अन्नपदार्थांना आहारातून वगळ्याला हवं. जेणेकरून शरीरातील युरिक एसिडची लेव्हल नियंत्रणात राहील. 

शतावरी

शतावरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि अन्य तत्व असतात. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा युरिक एसिड बाहेर पडतं.  शतावरीच्या सेवनानं रक्तातील युरीक एसिडची लेव्हल वाढते आणि गाऊटचा धोका वाढतो.

पालक युरीक एसिडचा रामबाण उपाय

हिवाळ्याच्या दिवसात पालकाचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. या भाजीत प्युरिन कमी प्रमाणात असते. यामुळे गाऊटची समस्या उद्भवत नाही. याव्यक्तिरिक्त पालक आयर्नचाही मुख्य स्त्रोत आहे. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. 

ब्रोकोली

ज्यांना गाऊटची समस्या आहे. त्यांच्यासाठी  ब्रोकोली हा उत्तम पर्याय आहे. यात व्हिटामीन सी असते. आर्थरायटिस फाऊंडेशननुसार व्हिटामीन सी युक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यानं  गाऊट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.  व्हिटामीन  सी शरीरातील युरिक एसिड लेव्हल कमी होण्यास मदत होते. 

हिरवे मटार खा

आर्थरायटिस फाऊंडेशच्या रिपोर्टनुसार मटारसारख्या  प्रोटिन्सयुक्त भाज्या युरिक एसिड लेव्हल वाढवत नाहीत. यामुळे गाऊट अटॅकपासून वाचता येतं. याव्यतिरिक्त तुम्ही बीन्स, डाळी, पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता. 

Web Title: 5 vegetables that can reduce uric acid level and gout risk according to arthritis foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.