Lokmat Sakhi >Fitness > हिवाळ्यात पचनशक्ती वाढवणारे ५ उपाय, भूकच लागत नाही, जेवणच कमी जाते, ही तक्रार विसरा..

हिवाळ्यात पचनशक्ती वाढवणारे ५ उपाय, भूकच लागत नाही, जेवणच कमी जाते, ही तक्रार विसरा..

5 Ways To Boost Metabolism In Winter : तुमचा 'मेटाबॉलिझम रेट' जितका वेगवान असेल, शरीर तितकेच तंदुरुस्त व निरोगी राहील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 11:40 AM2022-12-24T11:40:46+5:302022-12-24T11:54:29+5:30

5 Ways To Boost Metabolism In Winter : तुमचा 'मेटाबॉलिझम रेट' जितका वेगवान असेल, शरीर तितकेच तंदुरुस्त व निरोगी राहील.

5 Ways To Boost Metabolism In Winter | हिवाळ्यात पचनशक्ती वाढवणारे ५ उपाय, भूकच लागत नाही, जेवणच कमी जाते, ही तक्रार विसरा..

हिवाळ्यात पचनशक्ती वाढवणारे ५ उपाय, भूकच लागत नाही, जेवणच कमी जाते, ही तक्रार विसरा..

आपण बऱ्याचदा ऐकलं असेल ज्या व्यक्तीच मेटाबॉलिझम करण्याची प्रक्रिया खूप छान आहे ती व्यक्ती नेहमी तंदुरुस्त राहते. आणि जर एखाद्या व्यक्तीच मेटाबॉलिझम खूपच स्लो असेल तर त्या व्यक्तीला खूप शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण हे 'मेटाबॉलिझम' म्हणजे नेमकं आहे काय ? 'मेटाबॉलिझम' म्हणजे थोडक्यात 'चयापचय क्रिया' आपण जे अन्न खातो त्या अन्नाला ऊर्जेमध्ये रूपांतरीत करण्याच्या प्रक्रियेला 'मेटाबॉलिझम' असे म्हणतात. ज्या व्यक्तीचे 'मेटाबॉलिझम' चांगले असते त्यांचे अन्न पचन लवकर होते, किंवा अशी व्यक्ती जड अन्न देखील काही वेळात पचवू शकते. तेच ज्या व्यक्तीचा 'मेटाबॉलिझम' स्लो आहे त्या व्यक्तीला अन्न पचवायला जास्त वेळ लागतो. असे अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटी, करपट ढेकर, पोटदुखी अशा वेगवगेळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'मेटाबॉलिझम रेट' वाढविणे खूप गरजेचे असते. यासाठी आपण अनेक उपाय आजमावून बघतो. 'मेटाबॉलिझम रेट' वाढविण्यासाठी काय उपाय आहेत ते समजून घेऊयात (5 Ways To Boost Metabolism In Winter).

काय - काय उपाय करता येतील ? 

१. हाय इंटेन्सिटी वर्कआउट - हाय इंटेन्सिटी वर्कआउटमुळे तुमचा 'मेटाबॉलिझम रेट' वाढून शरीरातील फॅट व कॅलरीज जास्त बर्न होतील. हाय इंटेन्सिटी वर्कआउटमध्ये सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यांसारख्या वर्कआउटचा समावेश नक्की करा. हाय इंटेन्सिटी वर्कआउटमध्ये सर्वात जास्त चपळ व्यायाम प्रकारांचा समावेश होतो. हा प्रकार वर्कआउटनंतरही आपल्या मेटाबॉलिझमला गती देतो, ज्यास 'आफ्टरबर्न' म्हणतात.

२. प्रोटीनचा समावेश - आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने तुमचा 'मेटाबॉलिझम रेट' वाढण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही दूध, दही, व्हे प्रोटीन, पनीर यांसारख्या पदार्थांचा जेवणात समावेश करायला हवा. 

३. भरपूर पाणी प्या -  'मेटाबॉलिझम रेट' वाढविण्यासाठी तुमच्या शरीराने हायड्रेटेड असणे गरजेचे असते. शरीराला सतत हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. पाणी पिण्यामुळे तुमचे पोट सतत भरलेले राहील व तुम्ही जास्त काळासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकता. 

४. चांगली झोप -  'मेटाबॉलिझम रेट' वाढविण्यासाठी तुमची झोप देखील पूर्ण झाली पाहिजे. पुरेशी झोप न झाल्यामुळे तुमचा 'मेटाबॉलिझम रेट' कमी होऊन परिणामी लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेतली तर तुमचा 'मेटाबॉलिझम रेट' वाढण्यास मदत होईल. 

५. स्ट्रेंथ ट्रेनिंग - आपल्या स्नायूंचा थेट आपल्या मेटाबॉलिझमशी संबंध असतो. व्यायामासोबतच स्ट्रेंथ वर्कआउटही स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. तुमच्या स्नायूंची स्ट्रेंथ जितकी चांगली तितकाच तुमचा मेटाबॉलिझम रेट वाढण्यास मदत होते.

Web Title: 5 Ways To Boost Metabolism In Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.